10:42pm | Sep 29, 2022 |
सातारा : परळी, ता. सातारा येथील खोऱ्यामध्ये वनविभागात काम करणारा वनरक्षक अत्यंत मनमानीपणे कारभार करत असून तो स्वतःच झाडे तोडण्याचे कॉन्ट्रॅक्टर घेत असल्याने परळी खोऱ्याला बेसुमार वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. दरम्यान, या कामातून त्याने लाखो रुपयांची माया जमवली असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, परळी परिमंडळ विभागात वन विभागाचे दोन कर्मचारी काम करतात. परळी परिमंडळात पळसावडे, ठोसेघर कुसावडे अशी काही बिटे आहेत. ठोसेघर बीटसाठी काही महिन्यापूर्वीच एक नवीन कर्मचारी रुजू झाला असून त्याने अत्यंत मनमानीपणे काम करण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खाजगी मालकीच्या क्षेत्रातील झाडे तोडायचे असतील तर त्यासाठी वनविभागाची विभागाची परवानगी लागते. तशा प्रकारच्या परवानगी बाबतचा अर्ज सातारा येथील मुख्य वनविभागाच्या कार्यालयात येताच संबंधित कर्मचारी त्या शेतकऱ्याशी तात्काळ संपर्क साधून किती झाडे तोडायचे आहेत? ती किती रुपयांना विकायची आहे? याबाबतची सविस्तर माहिती घेतो. परवानगी महिन्यापूर्वीच संबंधित शेतकऱ्याला भेटून झाडे तोडण्याचे कॉन्ट्रॅक्ट तो स्वतः घेत आहे. विशेष म्हणजे त्या कर्मचाऱ्याला तत्पुरत्या नियुक्तीवर नियुक्त केलेले वनमजूर मदत करत आहेत. मदत नाही केली तर त्यांना दमदाटी देण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. त्यासाठी प्रामुख्याने पाटण तालुक्यातून मजूर आणले जातात. वन विभागाच्या कर्मचारीच कॉन्ट्रॅक्ट घेतो म्हटल्यानंतर किती झाले तोडली जातात. याची कधीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आणि गळ्यातील ताईत बनलेल्या या कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया जमवली आहे. त्याने अनधिकृतपणे, बेकायदेशीरपणे जमवलेल्या मालमत्तेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागले आहे.
दुचाकीच्या पेट्रोलसाठी मागतो भिक, मग स्विफ्ट डिझायर कार कशी परवडते?
संबंधित कर्मचारी अत्यंत चालक, हुशार आणि स्वतःला चाणाक्ष समजतो. वनविभागाच्या कामाची कायद्यांची आपल्याला किती माहिती आहे असा सातत्याने तो आव आणतो. विशेष म्हणजे पठार परिसरात असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांकडे हाच कर्मचारी एकीकडे दुचाकीच्या पेट्रोलसाठी भीक मागतो. तर दुसरीकडे स्वतःच्या मालकीची स्विफ्ट डिझायर ही कार घेऊन फिरत असतो. मिळालेल्या माहितीनुसार तो सातारा येथे आलिशान फ्लॅटमध्ये वास्तव करत आहे. त्याच्या पगाराच्या आकडेवारीची माहिती घेतली असता तो परळी खोऱ्यात खोऱ्याने पैसे ओढत असल्याचे दिसून येत आहे.अनेक वखारवाल्यांशी लागेबांधे
परळी व परिसरात अनेक लाकडाच्या वखारी आहेत. या वखारींवर या कर्मचाऱ्यांचे बारकाईने लक्ष असते. सातारा येथून ठोसेघरकडे जाताना हमखास तो या वखारींना भेटी देऊन एक प्रकारे वखार वाल्यांच्यात दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे. संबंधित वखार मालकांनी झाडे तोडण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर तोडलेली झाडे ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणताना विनाकारण ट्रॅक्टर ट्रॉली अडवणे. कागदपत्रांची मागणी करून त्यांना नाहक त्रास देणे असे प्रकारचे उद्योग तो सातत्याने करत असल्यामुळे वखार वाल्यांनी त्याला मंथली सुरु केली असल्याची जोरदार चर्चा परळी खोऱ्यात सुरू आहे. त्याचे वकार वाल्यांशी असणारे लागेबंधे हाय ही एक चर्चेचा विषय झाला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |