11:39am | Sep 27, 2020 |
सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सिव्हिल)च्या ड्रेनेजची स्वच्छता करताना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी महिन्यापूर्वी स्वच्छता कामगारांना स्त्री जातीचे मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले होते. सर्वप्रथम याबाबतची माहिती मिळताच ‘सातारा टुडे’ने आपल्या परखड लेखणीने या प्रकरणाला वाचा फोडली. ‘सातारा टुडे’च्या दणक्याने अखेर शनिवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिला व गर्भलिंग निदान करणार्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा सिव्हिलच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये स्वच्छतागृहाचे ड्रेनेज चॉकअप झाले होते. हे चॉकअप काढण्यासाठी सफाई कर्मचारी बोलावण्यात आले. हे चॉकअप काढताना या सफाई कर्मचार्याला मृत अर्भक आढळून आले. या प्रकरणात संबंधित सफाई कर्मचार्याला आपल्या दालनात बोलावून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी तडकाफडकी कामावरुनही काढून टाकले होते. सर्वप्रथम याची माहिती मिळताच ‘सातारा टुडे’ने आपल्या परखड लेखणीने या गुन्ह्याला वाचा फोडली. मात्र तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी पत्रकार परिषद घेवून हे आरोप फेटाळून लावले. मात्र तरीही ‘सातारा टुडे’ने या प्रकरणाला वाचा फोडण्याचा चंगच बांधला असल्याने हे प्रकरण ‘सातारा टुडे’ने धसास लावले. या प्रकरणाची गंभीरता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या प्रकरणाची चौकशी या समितीने केली. यामध्ये डॉ. गडीकर यांच्यासह सिव्हीलमधील सर्व अधिकारी, डॉक्टर व कर्मचार्यांचे जाबजबाब घेण्यात आले. दि. 14 ऑगस्ट रोजी हा अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला होता. यानंतर कोरेगाव रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांनी गर्भलिंग करणारा अज्ञात व्यक्ती व संबंधित महिला अशा दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
यात संबंधित महिलेस पहिल्या तीन मुली असून प्रत्येक सोनोग्राफी करताना त्यांनी 2 मुली असल्याची खोटी माहिती संबंधित महिलेने दिली. यानंतर 27 जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वॉर्ड क्रमांक 7 मध्ये रक्तस्त्रावाचा त्रास झाल्याने ऍडमिट करण्यात आले होते. त्या शौचास गेल्या असता त्यांचा गर्भपात झाला. त्यांनी अज्ञात व्यक्ती मार्फत गर्भलिंग निदान करून गर्भपात करून मुल जन्मास येण्यास प्रतिबंध केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सपोनि संदीप मोरे करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |