सोलापूर : राष्ट्रवादीचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देताना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर भारत भालके हे कोरोनामुक्तदेखील झाले होती. मात्र, त्यांना पुन्हा एकदा अस्वस्थ जाणवू लागल्यानं त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. तिथं गेल्यावर त्यांना पोस्ट कोव्हिड झाला असल्याच निदान डॉक्टरांनी केलं होते. भालके याना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्यानं त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. भारत भालके हे थेट जनमानसात रमणारे आणि एकदम बेधडक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांपासून ते थेट मतदारही त्यांना फोनवर संपर्क करून बोलू शकत असल्याने ते याच लोकप्रियतेच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. भारत भालके यांच्या कारकिर्दीची सुरुवात औदुंबर पाटील यांच्या काळात झाली. त्यांनी भालके यांचा बेधडकपणा पाहून या पैलवान गड्याला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक केले. यानंतर अनेक राजकीय उलथापालथ घडत भालके स्वकर्तृत्वावर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष बनले. याच काळात 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला. याच मतदारसंघातून भालके यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा दणदणीत पराभव केला आणि त्यांना जायंट किलर हे नाव पडले. यानंतर 2014 साली पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा तिरंगी लढतीत पराभव करीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला. यावेळी त्यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि जेष्ठ आमदार कै सुधाकरपंत परिचारक याना धोबी पछाड देत विजयाची हॅट्रिक केली. भालकेंचे वैशिष्ट्य होते त्यांचे गावरान वकृत्व आणि याच जोरावर कोणतेही मोठे नेते नसताना भालके यांनी स्वतःच्या जोरावर तिन्हीवेळा आमदारकी मिळविली. यावेळी त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना लाल दिवा मिळाला नव्हता. अतिशय जिंदादिल, बेधडक आमदार म्हणून परिचित असलेले भारतनाना मृत्यूशी झुंज देत होते ते या लढाईतही विजयी होऊन पुन्हा परत येतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास होता.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |