04:00pm | Feb 06, 2021 |
चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या कर्णधाराने अक्षरक्ष: भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने धडाकेबाज द्विशतक ठोकल्याने इंग्लंडने चहापानापर्यंत 4 बाद 454 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी डॉम सिबली आणि दुसर्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्सच्या यांच्या साथीने जो रूटने संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले.
रूट-स्टोक्स जोडीने पहिलं सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व मिळवलं. दुसर्या सत्रात 118 चेंडूत 82 धावा करणारा बेन स्टोक्स मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर रूटने ओली पोपच्या साथीने डाव पुढे नेला आणि द्विशतक पूर्ण केलं. रूटने 300 हून अधिक चेंडू खेळून द्विशतक पूर्ण केलं.
दरम्यान, चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने 60 चेंडूत 33 धावा केल्या. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स शून्यावर बाद झाला. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. नंतर रूट-सिबलीने 200 धावांची भागीदारी केली. सिबली 87 धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |