07:24pm | Sep 17, 2022 |
सातारा : जागतिक पातळीवर नावलौकिक झालेली सातारा हिल मॅरेथॉन रविवार दि 18 रोजी साताऱ्यात होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर होणाऱ्या या हिल मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह दोन हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. त्यामुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून साताऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातील धावपटू आतुरतेने वाट पाहत असलेली ''सातारा हिल हाफ मॅरेथॉन'' स्पर्धा यंदा ''फिटनेस जिंदाबाद'' हे घोषवाक्य घेऊन आयोजित केली आहे. १८ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विविध गटांतील हौशी स्पर्धकांना सहभाग मिळावा, यासाठी संयोजकांनी सर्वांत अगोदर नावनोंदणीची संधी दिली आहे. शनिवारी साताऱ्यात धावपट्टू दाखल झाले. अनेक धावपट्टूंनी सायंकाळच्या सत्रात सराव केला. पोलीस कवायत मैदानं ते यवतेश्वर पठार या दरम्यानचा नैसर्गिक धाव मार्ग स्पर्धकांचा दमसासाची परीक्षा घेतो यंदाही ते चित्र पहायला मिळणार आहे. येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मल्टिपर्पज हॉलवर किट वाटप एक्सो सोहळा रंगला. याचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वाटप सोहळ्यात सहभागी खेळाडूंना मॅरेथॉन कीट वाटप करण्यात आले. यंदा सातारा हिल मॅरेथॉनचा उत्साह जास्त जाणवत आहे, अशी माहिती मॅरेथॉनच्या संयोजिका डॉ. सुचित्रा संदीप काटे यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे स्पर्धेत खंड पडला होता. मात्र, यंदा नव्या जोमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून प्रचंड मागणी असल्याने केवळ काही तासांतच सर्व नोंदणी पूर्ण होते.
गेल्या दोन वर्षांत यवतेश्वर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणामुळे मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्ते प्रशस्त झाले आहेत.
सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल
सातारा शहरामध्ये दि. 18 सप्टेंबर रोजी हिल हाफ मॅरेथॉन -2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंड येथून सुरुवात होवून पोवई नाका-मरीआई कॉम्प्लेक्स-शाहु चौक-अदालत वाडा रोड मार्गे-समर्थ मंदिर-बोगदा-यवतेश्वर-प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पासून वळून परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राऊंड अशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे 7 ते 8 हजार स्पर्धक भाग घोणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
तरी स्पर्धक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतूकीचे नियम व वाहनाचे पार्किंग करण्यासाठी पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार दि. 18 सप्टेंबर 2022 चे स. 5 वा. पासून सकाळी 10 वा. पर्यंत या कालावधीत खालीलप्रमाणे सातारा हिल हाफ मॅरेथॉन-2022 स्पर्धेकरिता सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल करीत आहे.
दैनंदिन वाहतूकीचे बंदी घालण्यात येणारे मार्ग : पोलीस परेड ग्राऊंड येथे सुरुवात होवून पोवई नाका-मरीआई कॉम्प्लेक्स-शाहु चौक-अदालत वाडा रोड मार्गे- समर्थ मंदिर- बोगदा- यवतेश्वर- प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पासून वळून परत त्याच मार्गाने समर्थ मंदिर- अदालत वाडा -नगरपालीका- शाहू चौक -मरिआई कॉम्प्लेक्स- पोवई नाका मार्गे पोलीस परेड ग्राऊंड हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमक दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीमध्ये प्रवेश बंद राहील.
वरील नमूद कालावधी करिता वाहतूक मार्गातील बदल : शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी. बी. कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून शहरात ये-जा करतील.
बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून सातारा शहरात येणारी सर्व वाहने जिल्हा परिषद-कनिष्क हॉल चौक-रिमांड होम मार्गे- जुना आर.टी. ओ. चौक अथवा बांधकाम भवन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौक- मुथा चौक-रिमांड होम मार्गे-सुभाषचंद्र बोस चौक मार्गे सातारा शहरात ये-जा करतील.
मुख्य बसस्थानक –राधिका सिग्नल-तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहराच्या बाहेर जातील.
सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी-जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.
कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी सर्व वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजु कडून सातारा बाजूकडे येणार नाहीत. ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा-एकीव-मोळेश्वर-कुसुंबीमुरा-कुसुंबी-मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.
पार्किंग : हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेकरिता येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी आपली वाहने ही प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या मैदानामध्ये, कलेक्टर ऑफिस ते जिल्हा परिषद ग्राऊंड रस्त्यांचे दोन्ही बाजुस, जुना आर. टी. ओ. चौक ते सुभाषचंद्र बोस चौक, करंजेनाका जाणारे रोडवर दक्षिण बाजुस लावतील.
तरी वरील वाहतूकीतील बदलाची नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |