नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी नॅशनल हेराल्डच्या दिल्लीतील कार्यालयासह १० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडीने नुकतीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. तसेच, मुंबईतही छापे टाकले आहेत.
सोनिया गांधी २१ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. तिथे त्यांची ३ तास चौकशी झाली. त्यानंतर ५ दिवसांच्या ब्रेकनंतर २६ जुलै रोजी त्यांची सलग ६ तास चौकशी केली. ईडीने मागील बुधवारीही सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हाही त्यांची ३ तास चौकशी झाली.
नॅशनल हेराल्ड एक वृत्तपत्र आहे. ते १९३८ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नामक कंपनीवर सोपवण्यात आली होती. २००८ मध्ये सलगच्या तोट्यामुळे हे वृत्तपत्रे बंद करावे लागले. तेव्हा काँग्रेसने एजेएलला पार्टी फंडातून बिनव्याजी ९० कोटींचे कर्ज दिले. त्यानंतर सोनिया व राहुल गांधी यांनी 'यंग इंडियन' ही कंपनी स्थापन केली. यंग इंडियनला असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात कंपनीची ९९ टक्के भागीदारी मिळाली. यात सोनिया व राहुल गांधींची प्रत्येकी ३८ टक्के भागीदारी आहे. तर उर्वरित वाटा मोतीलाल व्होरा व ऑस्कर फर्नांडीस या २ काँग्रेस नेत्यांकडे होता.
नॅश्नल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींची चौकशी झाली, त्या प्रकरणाची सुरूवात १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये झाली होती. तेव्हा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी दिल्ली हाय कोर्टात खटला दाखल केला होता. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने ९०.२५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे अधिकार प्राप्त करण्यासाठी केवळ ५० लाख रुपये मोजले. ही रक्कम काँग्रेसने एजेएलला दिली होती, असा आरोप स्वामींनी केला होता. या प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींसह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस, पत्रकार सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा या ४ जणांना आरोपी करण्यात आले होते.
जून २०१४ मध्ये कोर्टाने सोनिया व राहुल गांधी यांना समन्स बजावला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये ईडीने या प्रकरणाची दखल घेऊन मनी लाँड्रिंगची केस दाखल केली. सोनिया व राहुल यांनी २०१५ मध्ये ५० हजार रुपयांच्या जातमुचलका व तेवढ्याच रकमेच्या बॉन्डवर दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडून जामीन प्राप्त केला होता. त्यानंतर पुढील वर्षी २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वच आरोपींना या खटल्याच्या सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्यातून सूट दिली. पण कारवाई रद्द करण्यास नकार दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |