07:48pm | Oct 25, 2022 |
कराड : कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. 23 रोजी रात्री मुजावर कॉलनी या परिसरात पिस्टल मधून फायरिंग झाली. त्याबाबत शहारुख मुल्ला यांनी निशिकांत शिंदे व परशुराम करवले यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तक्रार दिल्याने कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे गांर्भिय ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी नमुदचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अमित बाबर यांचेकडे पुढील तपासकामी दिला.
उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमित बाबर व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने कौशलपुर्वक तपास करून नमुद गुन्ह्यातील संशयित निशिकांत शिंदे यास कराड येथून व तडीपार गुंड परशुराम रमेश करवले यास आटपाडी, ता.खानापूर जि.सांगली येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आलेले होते.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संबंधित गुन्ह्यातील संशयित यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 1,00,000/- रुपये किंमतीच्या 2 पिस्टल, पुंगळी व चाकु असे जप्त करण्यात आलेले आहे. हा गुन्हा घरासमोर बसण्याच्या कारणावरून झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर, सपोनि तब्बसुम शादीवान, सफौ सतीश जाधव, रघुवीर देसाई, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुंखे, कुलदीप कोळी, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, सागर भोसले, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, माणिक थोरात, सोनाली मोहिते यांनी केलेली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |