04:51pm | Jul 30, 2022 |
नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे पहिले पदक आहे. मलेशियाच्या बिन कसदान मोहम्मद अनिकने या खेळातील सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण 249 किलो वजन उचलले. संकेतला 248 किलो वजन उचलता आले. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला किरकोळ दुखापत झाली, त्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले.
संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलले. कोण आहे संकेत महादेव सरगर महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असलेल्या संकेत महादेव सरगरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. त्याने स्नॅचमध्ये 113 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकासह तो 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
21 वर्षीय संकेत महादेव सरगर खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 चा चॅम्पियन होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे वेटलिफ्टिंगमध्ये 126 वे पदक - 1990, 2002 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने वेटलिफ्टिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये 126 पदकांसह भारत हा दुसरा सर्वात यशस्वी देश आहे. या खेळांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत केवळ ऑस्ट्रेलियाने (159) त्याहून अधिक पदके जिंकली आहेत. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी वर्चस्व गाजवले, 5 सुवर्णांसह नऊ पदके जिंकली होती.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |