04:26pm | Aug 01, 2020 |
कराड : कृष्णा हॉस्पिटलने आज कोरोनामुक्तीचे ५ वे शतक पूर्ण केले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह 16 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 509 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कोडोली येथील 31 वर्षीय महिला, बुधवार पेठ – कराड येथील 31 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरूष, खळे-पाटण येथील 33 वर्षीय पुरूष, टेंभू येथील 40 वर्षीय महिला, तारळे-पाटण येथील 24 वर्षीय पुरूष, काळगाव येथील 20 वर्षीय महिला, नेराळे-पाटण येथील 32 वर्षीय पुरूष, नाटोशी-पाटण येथील 53 वर्षीय पुरूष, महिंद-पाटण येथील 58 वर्षीय पुरूष, वान्याचीवाडी-कराड येथील 62 वर्षीय महिला, किवळ-पाटण येथील 69 वर्षीय पुरूष, मिरगाव-पाटण येथील 31 विर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय पुरूष, कृष्णा हॉस्पिटल येथील 27 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
कोरोनाची लढाई जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांचा सत्कार कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, राजेंद्र सनदे, योगेश कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश पाटील, रोहिणी बाबर, कविता कापूरकर, संध्या जगदाळे यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.
22 जुलैला माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यावेळी मनात नक्कीच भिती दाटून आली होती. पण जसे मी कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये दाखल झाले, तसे मला पीपीई कीटमध्ये असलेल्या भगवंताचेच दर्शन झाले. आदरणीय डॉ. सुरेशबाबा भोसले, डॉ. अतुलबाबा भोसले व विनूबाबा भोसले यांनी सातत्याने माझ्या प्रकृतीची विचारपूस करत मला धीर दिला, त्यामुळे मला आधार मिळाला. योग्य आहार व औषधोपचार घेऊन आज बरे होऊन जाताना मला आनंद होत असून, कोरोनामुक्तीसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्धांचे मी यानिमित्ताने आभार मानते.
-रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कराड.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |