12:42pm | Jun 25, 2020 |
जिनिव्हा: जगभर कोरोना कहर सुरूच आहे. करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून जगभरात दररोज सरासरी एक लाख करोनाबाधित आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. येत्या एक आठवड्यात करोनाबाधितांची संख्या एक कोटींचा आकडा ओलांडणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केली.
जगभरातील करोनाबाधितांची संख्याही 93 लाखांच्या घरात पोहचली आहे. येत्या सात दिवसांत एक कोटी करोनाबाधित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरातील संशोधक लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लस कधी येईल हे अनिश्चित आहे. तोपर्यंत
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी सौदी सरकारने हज यात्रेवर घातलेल्या निर्बंधांचे त्यांनी स्वागत केले.
अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत ऑक्सिजन मशीनची कमतरता आहे. अनेक देशांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचीही कमतरता भासणार असल्याची शक्यता आहे. दर आठवड्याला सरासरी दहा लाख लोकांना करोनाची बाधा होत आहे. त्यामुळे प्रतिदिवस 88 हजार मोठे ऑक्सिजन सिलेंडर आणि 6.20 लाख क्युबिक मीटर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. लवकरच हा आकडा कोटींच्या घरात जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत 14 हजार ऑक्सिजन मशीन खरेदी केली आहे. येणार्या काही दिवसात 120 देशांमध्ये ऑक्सिजन मशीन पाठवण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |