सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना 'समतेचे जागतिक प्रतिक' असा बहुमान घोषित करुन डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा समतादिन म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केला आहे. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा साताऱ्याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरतंन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.
ज्या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला त्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने होते.
साहित्यिक अरुण जावळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला घेऊन जायला हवे. त्यांचा संघर्ष, त्यांचा शैक्षणिक प्रवास हा विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि प्रेरणा बनायला हवा, तरच डॉ. आंबेडकराच्या स्वप्नातील विद्यार्थी घडू शकतील आणि मग राष्ट्रही आपोआप घडू शकेल. त्यामुळे मजबूत विद्यार्थी घडविण्याचं कार्य आपण सुरू ठेवुयात. आंबेडकरांचा विचारवारसा जर आपल्या जपायचा असेल, हे राष्ट्र सक्षम - समृध्द बनवायचे असेल तर नव्या पिढीकडे अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने आपण पहायला हवे. कारण नवी पिढी हीच उद्याचा नवा भारत असणार आहे.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सन्मती देशमाने म्हणाले ज्या हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले ते हायस्कूल चालविण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. या हायस्कूलला लाभलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा निश्चितपणे अधिक सक्षमपणे जपण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे हायस्कूल कसे पोहचेल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा प्रयत्न यशस्वी करणं हीच एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक राजेंद्र कांबळे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानावर भाष्य केले. छ. प्रतापसिह हायसूकूमधील शिक्षक महेंद्र एकळ यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले, तर आभार महेश घाडगे यांनी मानले. यावेळी पूनम महाजन, सतीश गोफणे, उत्तम साळुंखे, अर्चना पंडत, विशाल अडसूळ आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |