02:02pm | May 26, 2020 |
सातारा : शासकीय नियमांचे पालन करून मंडप व्यवसाय चालू करण्यास परवानगी मिळावी, मंडप व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, आदी मागण्या मंडप असोसिएशनने एका निवेदनाद्वारे केल्या आहेत.
मंडप व्यवसायिकांच्या विविध अडचणी संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंडप असोशियन यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की कोरोना महामारीत व्यावसायिकांना ज्या अडचणी आल्या आहेत. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असणारा कामगार वर्ग यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ व्यवसायिकांना बँकांच्या हप्त्याची काळजी तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे हप्ते फेडता येत नाहीत. त्यामध्ये सूट देण्यात यावी. या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून या व्यवसायांना बँकांचे कर्ज मिळताना सोपे जाईल तसेच या उद्योगांना अनुदानसुद्धा मिळू शकेल. यासाठी या मागणीची आवश्यकता आहे. हे त्यांना पटवून दिले. तसेच शासकीय नियमांचे पालन करून व्यवसाय चालू करण्यास परवानगी मिळावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन ना. शंभूराज देसाई यांना देण्यात आले. या सर्व गोष्टीची माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनी एकंदर या व्यवसायांमध्ये जिल्ह्यांमध्ये ३ हजार व्यवसायिक आणि सुमारे दीड लाख कामगार वर्ग आणि त्यांचे कुटुंब अवलंबून आहे याची माहिती घेतल्यावर ना. देसाई यांनी हा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मंडप व केटर्स असोसिएशनच्यावतीने त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हातील पालकमंत्र्यांना हे निवेदन देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समक्ष भेटुन निवेदन देण्यात यावे. म्हणजे या प्रश्नाची सोडवणूक करण्यास आम्हा सर्वांना सोपे जाईल, असे आश्वासन त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाध्यक्ष रामभाऊ हादगे, केटर्स असोसिएशनचे भरत वैष्णव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |