10:34pm | Oct 28, 2020 |
सातारा : घरफोडी व दुचाकी चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) दोघांच्या टोळीला जेरबंद केले. संशयितांनी भुईंज, खंडाळा व कोरेगाव येथे घरफोड्या केल्या असून त्यांच्याकडून होम थिएटरसह विविध वस्तू जप्त केल्या आहेत.
अक्षय हणमंत जाधव (वय 23, रा.शेंदुरजणे ता.वाई) व सोमनाथ साबळे (रा.खर्शी ता.जावली) अशी संशयित आरोपींची नावे आहेेत. दरम्यान, यामध्ये अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एलसीबीचे पथक दि. 28 रोजी वाई शहर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी घरफोडीमधील साहित्याची विक्री करण्यासाठी काही संशयित येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी करुन मुद्देमालाबाबत विचारले असता त्यांनी त्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी होमथिएटर, साउंड, बल्ब, स्वॅप मशीन, दोन दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जप्त केलेल्या वस्तूंचा पोलिसांनी पंचनामा केला. यातील दोन दुचाकी या अल्पवयीन मुलाने चोरल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दाखल गुन्ह्यांची माहिती घेतली असता संबंधित चोरीप्रकरणी भुईंज, खंडाळा व कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहेे. दरम्यान, संशयितांनी आणखी कुठे चोर्या केल्या आहेत का? याचाही पोलिस तपास करत आहेत.
पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, रविंद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |