पुसेगाव: पुसेगावसह परिसरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा पाहता कोविड सुरक्षा ग्रामस्तरीय समितीने गावाच्या मध्यभागी असलेली भाजी मंडई गावाच्याबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला. ही मंडई आता बुध रोड नजिक एसटी स्टँडच्या मोकळ्या जागेत भरणार आहे. ग्रामस्तरीय समितीने पुसेगाव बाजार पेठेत फिरून भाजी मंडईत तसेच अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या व्यवसायिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले.
पुसेगावातील भाजी मंडई गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या मंडईच्या परिसरामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, सजा तलाठी कार्यालय, बँका, सोसायटी व पोस्ट, कार्यालय आहेत आहेत. या परिसरामध्ये नेहमी वर्दळ असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भाजी मंडई लोकवस्तीपासून दूर गावाच्या बाहेर हलविण्यात आल्याचे तलाठी गणेश बोबडे यांनी सांगितले. सद्यस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. त्यामुळे याच दुकानात लोकांची जाणे येणे होत आहे. त्यामुळे हेच दुकानदार भाजीपाला व्यापारी कोरोना स्पिडर ठरण्याचे लक्षात घेऊन व्यापारी भाजीपाला विक्रेते दुकानदार यांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. कोरोना चाचणी करणार नाहीत. त्यांना व्यवसाय करता येणार नाही, असा इशारा व्यवसायिकांना देण्यात आला आहे.
नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडल्यावर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतराचे नियमांचे पालन करून स्वतः सह इतरांच्या जिविताची काळजी घेण्याची गरजेचे आहे, असे यावेळी तलाठी गणेश बोबडे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |