कराड : येथील कोल्हापूर नाक्यावर कंटेनरच्या धडकेत वृद्ध दुचाकीस्वार ठार झाला. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रघुनाथ महादेव शिंदे (वय ७०) रा. विंग ता. कराड असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर सय्यद जाफर गजनफर अली रा. भनेडा ता. नजिमाबाद, जि. बिजनोर (उत्तर प्रदेश) या कंटेनर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विंग ता. कराड येथील रघुनाथ शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० एस २३८२) कराडकडे येत होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाका येथे पोहोचले असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने (क्र. एमएच ०१ डीआर ३५१४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच हवालदार धिरज चतुर व प्रशांत जाधव तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी रघुनाथ शिंदे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार धिरज चतुर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंटेनर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |