06:48pm | Oct 24, 2022 |
कराड : दिवाळी सणाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने 21-22 या वर्षातील डॉ. ओमप्रकाश मोतीपावले यांच्या डिस्ट्रिक्ट ग्रँटमधून साकारलेल्या समाजोपयोगी उपक्रमानुसार गतवर्षीचे रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे व सचिव अभय पवार यांच्या प्रयत्नांतून 'सावित्री कन्या’ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत कराड शहर आणि परिसरातील १८ सावित्रीच्या लेकींना या सायकलींचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कराड ला 21-22 या वर्षातील डॉ.ओमप्रकाश मोतीपावले यांच्या डिस्ट्रिक्ट ग्रँटमधून सावित्री कन्या’ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत १८ सायकली मिळाल्या होत्या. या सायकली वाटप करताना 11 जिल्हा परिषद व नगरपालिका, माध्यमिक शाळांमधील होतकरू, कष्टाळू आणि गरजू मुलींना त्यांची परिस्थितीची पडताळणी करून शाळेतील मुख्याध्यापकांच्या मागणी पत्रानुसार या सायकली निवड झालेल्या मुलींना मोफत देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी लाभार्थी मुली, त्यांचे पालक, शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने २१-२२ चे अध्यक्ष रो. चंद्रकुमार डांगे, सचिव अभय पवार, विद्यमान अध्यक्ष प्रबोध पुरोहित, सचिव चंद्रशेखर पाटील, किरण जाधव, गजानन माने, राजेश खराटे, राहुल कुलकर्णी, जगदीश वाघ, रामचंद्र लाखोले, बद्रीनाथ धसके, राजू खलीपे, ज्ञानदीप सामाजिक संस्थेच्या संचालिका मधुराणी थोरात आदीसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, नगरपालिका शाळा क्रमांक ७ चे मुख्याध्यापक संकपाळ, न्यू इंग्लिश स्कूल ओगलेवाडीचे मुख्याध्यापक अधिक डुबल, केदार हायस्कूल, सुपनेचे शेवाळे सर, ओंड हायस्कूलचे चव्हाण सर यांनी रोटरी क्लब ऑफ कराडच्या कार्याचे कौतुक करून या अमूल्य मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
रो.किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, उपस्थित रोटरी सदस्यांच्या वतीने शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष चंद्रकुमार डांगे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. तसेच प्रबोध पुरोहित यांनी रोटरीच्या कार्याबद्दल माहिती दिली. राहुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सचिव चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले.
सावित्रीच्या लेकींसाठी मदतीचा हात
या सायकल प्रोजेक्टसाठी प्रशांत शिंदे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, ज्ञानदीप सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष आनंदा थोरात, डॉ.अमर पाटील, डॉ.राहुल फासे, तसेच सिद्धार्थ मंगल कार्यालयाचे महादेव उर्फ बंडा शिंदे यांनी आर्थिक मदत करून सावित्रीच्या लेकींना एकप्रकारे मदतीचा हात दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |