06:57pm | Dec 15, 2020 |
कराड : येथील बाराडबरे परिसरात काल एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणातील तिघा संशयितांना आज कराड कराड पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून हे तिघेही अल्पवयीन आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य गौतम बनसोडे (वय 16, रा. शिवाजी स्टेडियमच्या पाठिमागे, बाराडबरे, कराड) हा दुपारी बाराडबरे परिसरातील राजवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी तीन संशयित युवक तेथे आले. त्यांनी अचानक आदित्यवर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. आदित्यने बचावासाठी आरडाओरडा केला. मात्र, पोटावर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून आदित्य रस्त्यावरच पडला. हा हल्ला करुन संशयित पसार झाले. यानंतर परिसरातील लोक आणि आदित्यच्या कुटूंबियांनी त्याला उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, कृष्णा रूग्णालयातील डॉक्टरांनी आदित्य हा मृत झाल्याचे घोषित केले होते.
घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची दिशा निश्चित केली होती. याबाबत त्यांना आदित्यची त्याच परिसरातील काही युवकांशी खुन्नस होती, अशी माहिती मिळाली.
पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संशयितांच्या शोधात होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने तिघा संशयितांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले. तिनही संशयित अकरावीत शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी प्रार्थमिक चौकशी केली. पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील पुढील तपास करत आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |