08:33pm | Mar 06, 2022 |
वाई : वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळ पांढर्या रंगाची विना नंबर प्लेटची फॉर्च्युनर गाडी उभी असून यामध्ये पाच सहा जण संशयित बसलेले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सागर संदीप साबळे (सातारा) हा तडीपार गुंड पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी साहिल अय्याज इनामदार (वय 23 ,सातारा),राहुल अशोक कदम (28, खोजेवाडी,सातारा)महेंद्र लक्ष्मण गायकवाड( 28, खोजेवाडी)सागर अनिल पडवळ (27 ,शेंद्रे ता सातारा)साद अय्याज बागवान (17, गुरुवार पेठ, सातारा) या पाच जणांना तांब्यात घेतले.त्याच्याकडे अवैध पिस्तूल सापडले ते पोलिसांनी जप्त केले.पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीही जप्त केली आहे
सागर संदीप साबळे हा सातारा जिल्ह्यातुन नुकताच तडीपार केलेला गुंड असून साहिल अय्याज इनामदार हा सुद्धा तडीपार होता. याची तडीपारी नुकतीच संपली आहे. वरील पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता सागर साबळे बरोबर पाचगणीला जेवायला निघाल्याचे सांगितले. येथील राजयुग हॉटेलचा मालक सचिन येवले हा सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णा पवार, सहायक उपनिरीक्षक विजय शिर्के, किरण निबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, रेखा तांबे, ज्योती सुतार, सागर धुमाळ, सुमित मोहिते, अक्षय नेवसे, हेमंत शिंदे यांनी भाग घेतला. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ. शितल जानवे खराडे यांना कळविण्यात आली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |