01:44pm | Jul 05, 2020 |
सातारा : येथील सिंचन विभागातील वादग्रस्त व लिंगपिसाट कार्यकारी अभियंता प्रकाश दत्तात्रय उर्फ पी.डी. जाधव वर अजून एका सहकारी महिलेने विनयभंग तसेच ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्यामुळे पी.डी. जाधवने केलेल्या मस्तीचा घडा फुटल्यामुळे सिंचन विभागातील अनेक पीडित महिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे.
कृष्णा खोरे महामंडळांतर्गत येणार्या सिंचन विभागातील वादग्रस्त कार्यकारी अभियंता प्रकाश दत्तात्रय उर्फ पी.डी. जाधव याच्याविरोधात त्याच्याच कार्यालयात कार्यरत असणार्या एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर काल म्हणजे 4 जुलै रोजी दुसर्या एका सहकारी महिलेने त्याच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारीसह ऍट्रोसिटीची तक्रार दिली आहे. त्यामुळे पी.डी. जाधवच्या साळसूदपणाचा बुरखा टराटरा फाडला गेला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून पी.डी. जाधव हा संबंधित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरुन हाताला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करीत होता. तसेच याबाबत बाहेर कोठेही वाच्यता केल्यास गोपनीय अहवालावर शेरा मारण्याची धमकी देत होता. तसेच वेळावेळी हा प्रकार पी.डी. जाधव करीत असल्याने यापूर्वी संबंधित महिलेने याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार वरिष्ठांनी पी.डी. जाधवला सक्तीच्या रजेवर पाठविले होते. दरम्यान, 29 जून रोजी पी.डी. जाधव हा सक्तीच्या रजेवरुन पुन्हा कामावर हजर झाला. त्यावेळी त्याने संबंधित महिलेला बोलावून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच माझी वरपर्यंत राजकीय पोहोच आहे. त्यामुळे तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही, असा दमही संबंधित महिलेला दिले.
त्यामुळे सततच्या होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संबंधित महिलेने प्रकाश दत्तात्रय उर्फ पी.डी. जाधव विरोधात काल दि. 4 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व ऍट्रोसिटीची तक्रार दिली असून याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे दिला आहे.
एका आठवड्यातच पी.डी. वर दोन गुन्हे दाखल
सातारा जिल्ह्यातील एका आमदाराच्या भावाच्या जिवावर मिजास मारणारा लिंगपिसाट कार्यकारी अभियंता पी.डी. जाधव उर्फ चार्ल्स शोभराज याच्यावर त्याच्याच कार्यालयात कार्यरत असणार्या दोन महिलांनी विनयभंगासह एकीने ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याने मस्तीत असणार्या पी.डी. जाधवचा पाय अधिक खोलात गेला आहे. माझे कोणी बिघडवू शकत नाही, या तोर्यात वावरणार्या पी.डी. जाधवला त्याचा गॉडफादर ‘मिलिंद’ही वाचवू शकला नाही. सावित्रीबाई फुलेंचा वारसा असणार्या सातारा जिल्ह्यात मस्ती फार काळ टिकत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भविष्यात या लिंगपिसाट कार्यकारी अभियंत्यावर पीडित महिलांकडून अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याला पाठबळ देणार्या त्या आमदाराच्या भावासह त्या आमदारावरही ‘सातारा टुडे’चा दंडुका बसणारच आहे. याबाबत साशंकता नसावी.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |