11:00pm | Dec 21, 2021 |
फलटण : भारतीय जनता पार्टी, फलटण यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली दिनदर्शिका म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आरसा आहे, या दिनदर्शिकेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह यांचे कार्य घरोघरी पोहोचवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, सुशांत निंबाळकर, फलटण तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उषा राऊत, शहराध्यक्ष सौ. कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, दिनदर्शिका हे जाहिरातीचे उत्तम साधन असून प्रत्येक घरांमध्ये व दैनंदिन जीवनामध्ये दिनदर्शिकेचे स्थान अत्यंत आवश्यक वस्तूमध्ये समाविष्ट झाले असून दिनदर्शिकेचे अंतरंग स्पष्ट करताना त्यांनी केंद्र सरकार देशभर राबवित असलेल्या जनहिताच्या अनेक योजनांचा आढावा घेतला. याशिवाय माढा मतदारसंघात खासदार रणजितसिंह यांनी भव्य स्वरूपात केलेल्या विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही उपक्रमांच्या फोटोचा व माहितीचा अंतर्भाव या दिनदर्शिकेत अतिशय उत्तमरित्या प्रकाशित केलेला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी फलटण शहर भाजपा प्रमुख अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिनदर्शिकेची गरज व त्यासाठी केलेल्या परीश्रमाबद्दलची माहिती दिली. फलटण तालुका भाजपा पक्षप्रमुख बजरंग गावडे यांनी खासदार रणजितसिंह करीत असलेल्या धडाकेबाज विकासकामांचा आढावा घेतला व खासदार यांचे हात बळकट करण्यासाठी, पक्षवाढीसाठी व विकासकामासाठी सर्वांनीच खूप कष्ट करून मेहनतीची गरज प्रतिपादित केली.
याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत काळे यांनी अल्पावधीत खासदारांनी खूप मोठ्या विस्तृत विकासकामाचा डोंगर उभा केला असून दिनदर्शिकेची जाहिरात म्हणजे घागर मे सागर भरण्याचा प्रयत्न केल्याचे विशद केले. दिनदर्शिकेच्या सुबक छपाई बद्दल राहुल शहा व सौ. मुक्ती शहा यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमास डॉ. प्रवीण आगवणे, डॉ. सुभाष गुळवे, सुनील जाधव, राजेंद्र नागटिळे, संतोष सावंत, नितीन वाघ, रियाज इनामदार, संजय गायकवाड, किरण राऊत, सोमनाथ यमगर, राजू काळे, राहुल पिसाळ, सौ. ज्योती इंगवले, सौ सावंत व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |