सातारा: केंद्रसरकारच्या सूचनेनुसार, ज्यांना मधुमेह, हदयरोग, रक्तदाबासारखे गभीर आजार आहेत अश्या 45 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरीक आणि जेष्ठ नागरिक यांच्याकरीता नगरपरिषदेच्या पुज्य कस्तुरबा रुग्णालयात आणि गोडोली येथील (कै.) दादामहाराज आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिड 19 वरील देण्यात येणारी लस मोफत स्वरुपांत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोफत लसीचा लाभ सर्व संबंधीतानी घ्यावा, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
कोविड 19 या संसर्गजन्य रोगावरील नागरीकांना देण्यात येेणारी लस केंद्र सरकारच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांसाठी मांफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या नागरीकांना मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार आहेत. अश्या 45 वर्षे वयापेक्षा जास्त वय असणार्या नागरीकांनाही सदरची लस मोफत देण्यात येणार आहे. सातार्यात नगरपरिषदेच्या पुज्य कस्तुरबा रुग्णालय, आणि नगरपरिषदेचे गोडोली येथील (कै.) प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आरोग्य केंद्र या दोन नागरीकांना आधारकार्डाचा पुरावा ग्राहय ठरवण्यात येवून, या ठिकाणी मोफत लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोराना या रोगावर अद्यापपर्यंत तरी जालिम शास्त्रीय उपचार उपलब्ध नसल्याने, कोरोना लस घेणे हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आजमितीस आहे. असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आवाहन केले आहे.
सदरची लस सुरक्षित असून, आजपर्यंत ग्राउंडलेव्हलला काम करणार्या आरोग्यसेवक, शासकीय कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी घेतलेली आहे. स्वतः जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखिल लस घेवून, लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला असल्याने, केंद्राच्या सूचनांनुसार या दोन केंद्रामधून मोफत लस उपलब्ध करुन देण्याच्या उपक्रमाचा जेष्ठ नागरीक आणि सर्व संबंधीतांनी लाभ घ्यावा. स्वतःच्या आधारकार्डासह सदर केंद्रावर जावून, संबंधीतांनी मोफत लस घेण्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती वजा आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |