03:10pm | Jan 06, 2021 |
सिडनी: अॅडलेड कसोटीतील मानहानीकारक पराभवाचा मेलबर्नमध्ये वचपा काढणार्या टीम इंडियात तिसर्या कसोटीतही बदल करण्यात आला आहे. टीम इंडियामधून महत्वाच्या खेळाडूंची एक्झीट झाली असली तरी हिटमॅन रोहित शर्माची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सिडनी येथील कसोटीत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार्या टीम इंडियाच्या संघात बदल करण्यात आले आहेत. तिसर्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर उद्या 7 जानेवारीपासून तिसरी कसोटी खेळली जाणार आहे. भारतीय संघाने सलग दुसर्या कसोटी सामन्यात संघात बदल केले आहेत. तिसर्या कसोटीसाठी भारताने संघात दोन बदल केले आहेत. रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. जखमी जलद गोलंदाज उमेश यादव यांच्या जागी नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे.
सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी स्टार फलंदाज रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत मयांक अग्रवालला धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या जागी रोहितला संधी देण्यात आली आहे. रोहितचा फक्त संघात समावेश झाला नाही तर त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळेच तिसर्या कसोटीचे महत्त्व वाढले आहे. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने नेतृत्व आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने कसोटी नेतृत्व केलेल्या आतापर्यंतच्या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |