06:29pm | Apr 12, 2018 |
सातारा : सध्या धार्मिक सण उत्सव यापेक्षाही सर्वाधिक खर्च हा विवाहसोहळ्यासाठी होत असतो. त्यामुळे सर्वच जातीधर्माच्या लोकांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. कर्जबाजारीपणामुळे कर्त्या पुरुषाला आत्महत्त्या करण्याची वेळ येते. या सर्व गोष्टीला फाटा देवून सातारा जिल्ह्यात धर्मादाय संस्था व सामुदायिक विवाह समिती यांच्यावतीने 11 मे रोजी सर्वधर्म समभाव विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ऍड. सचिन तिरोडकर, कार्याध्यक्ष डॉ. अशोक कदम व सौ. सीमा कुटे-जाधव यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सातारा याठिकाणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त आय. के. सुर्यवंशी, सौ. पी. आय. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या चळवळीला गती देण्याचे काम होणार आहे. 6 मे रोजी श्री भैरवनाथ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसा. यांच्यावतीने आदर्की, ता. फलटण व कोयना सोळशी सामाजिक विकास संस्थेच्यावतीने तळदेव, फलटण याठिकाणीही या समितीच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा होत आहे.
इच्छुक वधु-वरांच्या पालकांच्या संमतीने होणार्या या विवाह सोहळ्यानिमित्त प्रत्येक जातीधर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे धार्मिक विधी होणार आहे. यानिमित्त समाजातील विविध स्तरातून मदतीचे हात पुढे आले असून त्या माध्यमातून सौभाग्याचे लेणे मणी-मंगळसूत्र, वधु-वरांना पोशाख, संसारोपयोगी भांडी, मानपान व वर्हाडाकडील शंभर नातेवाईक-मित्रपरिवाराला मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सामाजिक कार्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमार्फत अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्यासह डॉ. अशोक कदम, विनोद कुलकर्णी, सदाशिव बागल, ऍड. झिया शेख, बाळासाहेब कासार, सौ. सीमा कुटे-जाधव यांनी पुढाकार घेवून या विवाहसोहळ्यासाठी जास्तीत जास्त गरजवंतांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. विवाह नोंदणीसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, राजधानी टॉवर्स सातारा व श्री बालाजी प्रेस्टीज 4 था मजला, ग्रामोद्धार बिल्डिंग शेजारी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विवाह नोंदणी अर्ज विहित नमुन्यात करुन सोबत शपथपत्र, वधु-वरांचे छायाचित्र, जन्मदाखला, पालकांचे संमतीपत्र, आधारकार्ड, धार्मिक उल्लेख आदी तपशील सोबत जोडावा. इच्छुक वधु-वर व त्यांच्या पालकांनी दि. 30 एप्रिल 2018 पर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02162 - 280136, 228777 या नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. किमान शंभर इच्छुकांचे विवाह या सोहळ्यात होतील, अशी तयारी समितीने केली आहे. गावपातळीपर्यंत याचा प्रसार झाल्यामुळे सामुदायिक विवाह सोहळा ही लोकचळवळ बनेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |