फलटण : आमचे दैवत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत का? असा सवाल माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी उपस्थित केला आहे. डॉ. येळगावकर शुद्धीत आहात का? असे त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनीही खासदार रणजितसिंह यांना बोलावून त्यांचे कौतुक केले होते. संरक्षण मंत्री ना. अमित शाह यांनीही खासदार रणजितसिंह यांच्या कार्यपद्धतीला नावाजलेले आहे. पण, डॉ. येळगावकर यांना हे कसे दिसत नाही? हाच खरा कुतुहलाचा विषय आहे. आगामी काळात डॉ. येळगावकरांनी रणजितसिंहांविषयी ब्र शब्द काढल्यास त्यांचा मायणीत येवून पुतळा जाळण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अनुप शहा यांना दिला आहे.
डॉ. येळगावकर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक़र यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्याला उत्तर अनुप शहा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.
शहा यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानूसार, सातारच्या विश्रामगृहावर डॉ. येळगावकर हे कोणत्या अवस्थेत असतात? हे सर्वांना ठावूक आहे. भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य आहेत की सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते कार्यकर्ते आहेत, हे माण-खटाव तालुक्यातील जनतेला अजूनही समजलेले नाही. भारतीय जनता पार्टीत असूनही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनच वावरताना दिसत आहेत. डॉ. येळगावकर हे योगायोगाने आमदार झाले होते. त्यानंतर त्यांना एकदाही आमदारकीची संधी मिळालेली नाही. जनतेने नाकारलेल्या व आमदार जयकुमार गोरे यांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले, अशा डॉक्टरांना पक्षानेही बेदखल केले आहे. जर पक्षात त्यांना किंमत असती तर सातारच्या ना. दिपक पवारांऐवजी त्यांनाच एखादे महामंडळ दिले गेले असते. जनतेने आणि पक्षानेही नाकारलेल्या डॉ. येळगावकरांनी खासदार रणजितसिंहांविषयी यापुढे ब्र शब्द काढल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल. एव्हाना मायणीत येवून त्यांचा पुतळा जाळण्यात येईल, असेही शहा यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |