सातारा : मुंबईमध्ये असणार्या एका कंपनीमध्ये भागीदार होण्यासाठी ७० लाख रुपये भरा असे सांगून, पैसे घेवूनही भागीदार न करता तब्बल ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत शासकीय कॉन्ट्रॅक्टर तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात थांबून होते. दरम्यान, संशयित सर्व मूळ जावली तालुक्यातील असून ते तिघे बाप-लेक आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, तक्रारदार व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार व संशयितांची जमीन पुनर्वसनामध्ये गेली असून दोन्ही कुटुंब सातार्यात वास्तव्य करत आहेत. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. यातील संशयित आरोपी यांच्या मुंबई येथे तीन कंपन्या आहेत. यातील एका कंपनीमध्ये भागीदार होण्यासाठी संशयितांनी तक्रारदार यांना प्रस्ताव दिला. कंपनीमध्ये भागीदार होण्यासाठी संशयितांनी ७० लाख रुपये गुंतवावे लागतील असे सांगितले. सर्व चर्चा झाल्यानंतर त्यावर एकमत होवून तक्रारदार ७० लाख रुपये गुंतवण्यास तयार झाले.
जून २०१७ मध्ये तक्रारदार यांनी ७० लाख रुपये संशयितांना आरटीजीएसद्वारे दिले. पैसे दिल्यानंतर भागीदारीचे कागदपत्रे आठवड्याने आणतो असे संशयितांनी सांगिलते. मात्र आठवडा होवून गेल्यानंतरही संशयित भागीदारीचे कागदपत्रे घेवून गेले नाहीत. भागीदारीचे कागदपत्रे आणतो, असे म्हणत महिना वर्ष होवून गेेला. संशयितांनी रक्कम परत देतो, असे सांगून पुन्हा वेळ मारुन नेली. पैसे परत देत असल्याचे बनाव करुन केवळ ६ लाख रुपये तक्रारदार यांना दिले. उर्वरीत रक्कम मागणी केल्यानंतर मात्र संशयितांनी तक्रारदार यांनाच दमदाटी करत शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर तक्रारदार यांनी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |