12:33am | Jan 02, 2019 |
सातारा : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नासाठी पिच्छा पुरवत शाहूपुरीत राहणाऱ्या २३ वर्षीय युवतीस पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी साताऱ्यातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या आरबाज नईम शेख याच्याविरोधात सोमवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल असणारा शेख हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
शाहूपुरीत एक २३ वषींय युवती राहण्यास असून तीची जुन २0१५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरबाज नईम शेख याच्याशी मैत्री झाली. मैत्रीनंतर त्या दोघांमध्ये वारंवार फेसबुक चॅटींग होवू लागले. चांगली मैत्री झाल्यानंतर ती युवती आणि आरबाज शेख हे दोघे एकमेकांना भेटू लागले. आरबाज हा त्या युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करायचा आणि तीला अडवत असे. अडवणारा आरबाज शेख हा त्या युवतीस लग्न करण्याबाबत वारंवार विचारत असे. लग्नास सदर युवती संमती देत नसल्याने आरबाज शेख हा सतत चिडून असायचा. युवती लग्नास तयार होत नसल्याने नंतरच्या काळात आरबाजने वारंवार तीचा पाठलाग करणे सुरु केले. देवी चौक तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ अडवून आरबाज हा पिस्तुल व चाकुचा धाक दाखवत असे. धाक दाखवत असतानाच आरबाज हा युवतीला तसेच तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असे. युवती ज्या जीममध्ये जात असे त्याठिकाणी जावून तसेच वाटेत अडवून आरबाज हा युवतीच्या दुचाकीची चावी हिसकावून घेत तीला त्रास देत असे. जुन २0१५ ते दि.३१ डिसेंबर २0१८ या कालावधीत आरबाजने वारंवार त्या युवतीला शस्त्रांचा धाक दाखवत धमकावत शारिरिक आणि मानसिक त्रास दिला. वारंवारच्या त्रासास कंटाळून त्या युवतीने सोमवारी रात्री याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली. याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. किर्दत या करीत आहेत. गुन्हा दाखल असणारा शेख फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |