सातारा : आकले ता.सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल साईसागर ढाब्यामध्ये दि. 9 रोजी भरदुपारी सहा जणांनी धारदार चाकूने वार केला. या हल्ल्यात हॉटेलचा मॅनेजर जखमी झाला असून संशयितांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहेे.
मनिंदर कृष्णदेव वाघमळे (वय 32, रा. कण्हेर ता.सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली असून ते स्वत: जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, संशयित दि. 9 दुपारी हॉटेल साईसागरमध्ये जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असताना संशयित दंगा करत होते. यावेळी दुपारीचे तीन वाजले होते. संशयितांचा दंगा जास्तच वाढल्याने तक्रारदार हॉटेलचे मॅनेजर यांनी दंगा करु नका असे म्हटले. यावरुन संशयित चिडले व त्यांनी मॅनेजरला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
या सर्व घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हॉटेलमधील निलेश सुळके, बाळासाहेब घागरे यांनी भांडणे करु नका, असे म्हटले असता संशयितांनी थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका संशयिताने तिघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकू काढून तक्रारदार मनिंदर वाघमळे यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले. हल्ला झाल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत मनिंदर वाघमळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमीचा जाबजबाब घेतल्यानंतर संशयितांविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या सर्व घटनेनंतर पोलिस संशयितांचा शोध घेत असून ते अद्याप सापडलेले नाहीत. पोलिसांनी संशयितांचे वर्णन घेतले असून त्यांच्या तपासासाठी पथके रवाना झाली आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |