सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घालून दुचाकी व चारचाकी चोरणार्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या दोघांनी सात दुचाकी, दोन ओमनी व्हॅन, एक बलेनो कार अशा 10 गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान या दोघा आरोपींकडून 10 लाख 19 हजार किंमतीच्या चारचाकी व दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राहूल रमेश गुजर (वय 27, रा.गोडोली) व शंभू जगन्नाथ भोसले (वय 21, रा.कोडोली, सातारा) असी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे व त्यांचे पथक सातारा परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन इसम कोडोली परिसरात चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने तातडीने कोडोली परिसरात सापळा रचला असता त्या दोघांकडे विना क्रमांकाची दुचाकी होती. पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चोरीची दुचाकी मिळून आली त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी ती दुचाकी सातारा बांधकाम भवनाच्या पार्किंगमधून चोरी केले असल्याचे सांगितले. या दुचाकी चोरीचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
एलसीबीच्या पथकाने अधिक चौकशी केली असता या दोन संशयित आरोपींनी आतापर्यंत 7 दुचाकी, दोन ओमनी कार, एक बलेनो कार अशा दहा गाड्या चोरल्याची कबुली दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्व गाड्या त्यांच्याकडून हस्तगत केल्या असून एकूण 10 लाख 19 हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पथकाने ताब्यात घेतलेल्या गाड्यांमधील काही गाड्यांचे सातारा शहर पोलिस ठाणे, पोलादपूर पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल असून उर्वरित एक ओमनी कार, काळ्या रंगाची स्प्लेंडर, लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची प्लेजर, एक बजाज पल्सर 220, एक सुझुकी या गाड्यांच्या मालकांचा शोध सुरु असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईत जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, पोलिस नाईक मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रविण कडव, गणेश कापरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |