कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह संपन्न झाला. कर्मचार्यांना यावेळी औद्योगिक सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, पांडूरंग होनमाने, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, सेक्रेटेरी मुकेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय औद्योगिक सप्ताहानिमीत्त सुरक्षा सल्लागार राजाराम पात्रे, कोल्हापूर यांनी कामगार सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षितता व उत्पादकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उत्पादकते एवढेच सुरक्षिततेला महत्व आहे. औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी यांनी अपघात टाळून सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी कारखान्यात काम करताना कामगारांनी सुरक्षा नियमांचे पालन करून स्वतःचे, समाजाचे व देशाचे नुकसान टाळावे व संस्थेसाठी विनाअपघात कार्यरत रहावे.
कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर यांनी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा परिषदेची स्थापनेची माहिती देत सुरक्षा सप्ताहाचे महत्व सांगीतले व कामगारांनी आपल्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घ्यावी असे अवाहन केले. सेक्रेटेरी मुकेश पवार, असि. डिस्टलरी जनरल मॅनेजर प्रतापसिंह नलवडे, सुरक्षा व पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर,लेबर ऍन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, सॅनेटेरी ऑफिसर व्हि.जी.पवार, जिवाणूखत प्रकल्प प्रमुख डॉ. विजयकुमार कुंभार, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील, मिटींग असिस्टंट विलास पाटील, अजित पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सेक्रेटेरी मुकेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुरक्षा व पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |