02:36am | Nov 15, 2019 |
सातारा : शहापूर, ता.सातारा येथे गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) छापा टाकला. या कारवाईत आयशर टेंम्पोसह गुटख्याचा एकूण 25 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
राहूल वामन माने (वय 29, रा.शहापूर) असे अटक केेलेल्याचे व पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री शहापूर येथे गुटखा विक्रीचा टेंम्पो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करुन परिसरात छापा टाकला असता एम एच 11 एएल 3653 हा आयशर टेंम्पो निदर्शनास आला. पोलिसांनी त्यामध्ये पाहणी केली असता गुटखा होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता 20 लाख 28 हजाराचा 14 पोती गुटखा होता. टेंम्पोसह पोलिसांनी गुटखा जप्त करुन पोलिस ठाण्यात आणला व संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी या घटनेची माहिती अन्न व औषध विभागाला दिल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन संशयिताला अटक करण्यात आली. गुरुवारी संशयिताला न्यायालयात नेले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |