01:22am | Dec 10, 2019 |
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे अनेक पुरोगामी चेले तयार झाले असून रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राचे भूषण व बलस्थानच नव्हे तर सातारची महत्त्वाची नवीन ओळख बनली आहे, असे मत प्रा. राम जाधव यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या 33 व्या थोरांच्या स्मृती - व्याख्यानमालेत परिवर्तनाचे दीपस्तंभ मधील 'कर्मवीर भाऊराव पाटील व शतकमहोत्सवी रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ' या विषयावर ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष केशवराव कदम उपस्थित होते.
प्रा. राम जाधव म्हणाले, कर्मवीर अण्णा हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा चालवणारे क्रांतीकारक प्रतिभावंत, प्रॅक्टिकल आयडियालिस्ट होते. त्यांनी प्रबोधन, रचना व संघर्ष या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्रात फार मोठे काम केले आहे. मोडेन पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते.
श्रमप्रतिष्ठा जोपासणारी कमवा व शिका योजनेचा अण्णांचा प्रयोग अलौकिक असा आहे. त्यांनी जाणीवपुर्वक सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह काढून समाजात भातृभाव निर्माण करून समता प्रस्थापनेचा पाया रचला. रयत शिक्षण संस्थेने खेड्यापाड्यात प्राधान्याने प्राथमिक शाळा काढल्या. या शतकातील एकूणच साक्षरता व मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण रयतच्या प्रयत्नामुळेच वाढलेले आहे. राजेरजवाड्यांना जे जमले नाही ते कर्मवीरांनी साधले आहे.
केशवराव कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. रमेश इंजे, प्रा. सुवर्णा यादव, जे. के. सावंत, प्राचार्य सुहास साळुंखे, ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ, प्रा.मुरलीधर जगताप, प्रा. मोहिते ,प्रा. दत्ताजी जाधव, उदय चव्हाण, प्रकाश खटावकर, शाहीर श्रीरंग रणदिवे,अनिल वीर, सुभाष जाजू,दिलीप भोसले, जयंत उथळे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |