02:50am | Jun 24, 2018 |
सातारा : सातारा उपनगरातील प्रतापसिंहनगर येथील कुख्यात गुंड व मोक्क्यातील आरोपी दत्ता जाधव याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्याच्याशी संभाषण केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ए. जी. पवार व एस. सी. शिंदे या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबित केले आहे. दत्ता जाधव व या दोन कर्मचार्यांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून संपर्क झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलिस दलाकडे यांच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्ड क्लिप प्राप्त झाली आहे.
या क्लिपवरून पवार व शिंदे हे दोघे सतत दत्ता जाधव याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या क्लिपमध्ये पोलिस दलात जी काही गोपनीय कार्यवाहीबाबत माहिती देत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दत्ता जाधवला अटक करण्यापूर्वी हा संपर्क झाला असल्याचे उघड झाले आहे. चोरी, दरोडा आणि मोक्क्यातील आरोपी असलेल्या दत्ता जाधवला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी हे दोन कर्मचारी त्याला माहिती पुरवत होते. या आरोपीला पोलिसांना अटक करायची आहे हे माहित असून या दोघांनी वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली नाही. त्यामुळे या कर्मचार्यांनी गुन्हेगार असलेल्या जाधव याला एक प्रकारे मदत केल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे कर्तव्यात केलेली चूक, बेशिस्त आणि बेजबादारपणे वागणूक याचा ठपका ठेवत पवार व शिंदे यांना निलंबित करण्यात आले अहे. याबाबत प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे बेशिस्त वागणार्या व गुन्हेगारांना मदत करणार्या कर्मचारी व अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |