03:34pm | Dec 08, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने हॉटेल्सची उभारणी करण्यात आली आहे. या हॉटेलांसाठी काही निकषांवर परवाने देण्यात येतात. परंतू हे निकष पूर्ण होतात का? या हॉटेल्समध्ये चांगल्या प्रतीचे अन्न, स्वच्छता याची काळजी घेतली जाते का? याची कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नव्हती. खाबुगिरीला चटावलेले अधिकारी मंथली मिळाले की याकडे सोयिस्कररित्या डोळेझाक करताना दिसून येत होते. मात्र आता जिल्ह्यातील कित्येक दिवस सुस्तावलेले अन्न व औषध प्रशासन ‘एक्टिव्ह’ झाले असून जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा तालुक्यांतील 8 हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाने कारवाईचा बडगा उगारला. किचनच्या तेलकट भिंती, अस्वच्छता, टेस्ट कंट्रोलचे नसलेले रेकॉर्ड इत्यादीप्रकरणी संबंधित हॉटेल्सचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. खटावमधील मे. येरळा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सवरही कारवाई झाली आहे. कारभारात सुधारणा न झाल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांनी दिला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक हॉटेलांचे किचन अस्वच्छ असून त्या हॉटेलांची तपासणी नियमित व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्न प्रशासनच्या रेकॉर्डवर असलेल्या शेकडो हॉटेलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सातारा, कोरेगाव, खंडाळा तसेच खटाव तालुक्यातील हॉटेल्सच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये काही हॉटेल्सच्या कामकाजात त्रुटी आढळून आल्या. अन्न प्रशासनाने खटावमधील मे. येरळा मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्ट्सवर कारवाई केली आहे. याशिवाय खंडाळा तालुक्यातील मे. हॉटेल राजावत प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट पारगाव, मे. हॉटेल सुयश गार्डन शिरवळ, कोरेगावमधील हॉटेल गुलमोहर, हॉटेल स्काय लार्क, मे. हॉटेल दोस्ती ढाबा पिंपोडे खुर्द, हॉटेल महाराजा पॅलेस ल्हासुर्णे, मे. हॉटेल कोणार्क रहिमतपूर सातारा तालुक्यातील मे. सप्ततारा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट वाढे या हॉटेलवर कारवाई केली आहे. सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रुपाली खापणे, अस्मिता गायकवाड, राहूल खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तीन मिठाई दुकानांवर होणार कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ विक्री केल्याच्या अनुषंगाने सातार्यातील सहा मिठाई दुकानांचे नुमने तपासणी घेण्यात आले होते. त्यापैकी एसटी स्टँडसमोरील मे. रजतलक्ष्मी स्वीट्स, मल्हारपेठेतील मे. अमोल लिंबराज चंदनशीवे तसेच वाईतील मे. पी. डी. शहा अँड सन्स या तीन मिठाई दुकानांमधील खव्यांचे नमुने अप्रमाणित आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सातार्यातील मिठाई दुकानांतून मिठाईत भेसळ केली जात असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच दिवाळी, दसरा सणाच्या निमित्ताने मिठाई पदार्थांची मागणी वाढल्याने त्यामध्ये हमखास भेसळ केली जाते. खवा, सुका मेवा खाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे होऊन जाते. एसटी स्टँडमधील मे. रजतलक्ष्मी स्वीट्सबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर या दुकानाची अन्न सुरक्षा अधिकार्यांनी तपासणी केली होती. त्यानंतर मे. श्री अमोल लिंबराज चंदशीवे, मे. पी. डी. शहा ऍण्ड सन्स,पाटण तालुक्यातील मे. ईश्वर स्विट्स मार्ट मल्हारपेठ, पुसेगावातील मे. हॉटेल सेवागिरी व मे. सेवागिरी दुध विक्री केंद्र यांची तपासणी करुन नमुने घेण्यात आले होते. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच अन्न प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यामध्ये तीन मिठाई दुकानांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. त्या दुकानांतील अन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याचा दावा अहवालावरुन केला जात आहे. इतर तीन दुकानांचे अहवाल लवकरच येणार आहेत. अप्रमाणित दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |