05:16pm | Nov 18, 2019 |
सातारा : सदरबझार येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) समोर असलेल्या अजिंक्य हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यायापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. या संदर्भात ‘सातारा टुडे’ने याबाबत आज सकाळी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सातारा वाहतूक शाखेने त्वरित आरटीओ कार्यालयासमोरी बेशिस्त वाहनांच्या पार्किंगवर कारवाई करत हा रस्ता साफ केला. दरम्यान ‘सातारा टुडे’च्या वृत्तामुळेच अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील सदरबझार परिसरात असणार्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मात्र आरटीओ एजंटांच्या आशिर्वादाने सुरु असलेल्या दुकानदारीमुळे अजिंक्य हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यायापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या पार्किंगमुळे या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडालेला होता. असे असताना सातारा शहरात उचलाउचली करणारी वाहतूक शाखा मात्र याकडे ढुंकूनही पाहत नसल्याने आरटीओ एजंटांची मुजोरी वाढली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आरटीओ एजंटांनी आपली बेकायदेशीर दुकाने थाटल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. या संदर्भात अनेकदा संबंधित यंत्रणेकडे तक्रारीही दाखल झाल्या होत्या. परंतू याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. या मार्गावर शालेय विद्यार्थी, चाकरमानी, तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची संभावना होती. परंतू आज सकाळी ‘सातारा टुडे’ने याबाबत परखड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सातारा वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेत आरटीओ कार्यालयासमोरील बेशिस्त पार्किंग तसेच एजंटांच्या रस्त्यावरील दुकानांवर कारवाई करत काही मिनिटातच अजिंक्य हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यायापर्यंतचा रस्ता मोकळा केला. त्यामुळे प्रथमच या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. सकाळपासून या रस्त्यावर बाजार भरला होता. परंतू वाहतूक शाखेने मनात आणल्यानंतर आरटीओ एजंटांचा बाजार काही मिनिटांतच उठल्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांनी वाहतूक पोलीस तसेच ‘सातारा टुडे’चे आभार मानले आहेत. परंतू केवळ एक दिवसच कारवाई करुन चालणार नाही, तर उद्यापासूनही वाहतूक शाखेने नियमितपणे या मार्गावर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |