04:51am | Jun 08, 2019 |
वाई : उत्पन्नाचे बोगस दाखले देऊन शासकीय सेवेत असणाऱ्या भुईंज येथील दोघांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तलाठी व त्यांच्या मदतनीसांच्या अनागोंदी कारभारामुळे खळबळ उडाली आहे.
शासकीय सेवेत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र भुईंज तलाठी कार्यालयाने उत्पन्नाचे स्रोत न तपासता किंबहुना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बोगस उत्पन्नाचे दाखल दिले गेले आहेत. यामुळे पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. ही बाब जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाई प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे कागदोपत्री पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिली आहे. हा धक्कादायक प्रकार लोकशाही दिनातही उपस्थित केला गेला आहे.
वरिष्ठांच्या आदेशानंतर गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी दि. २५ मार्च २०१९ रोजी विस्तार अधिकारी यांना व संबंधित घरकुल योजनेतील लाभधारकांना पुरावे घेऊन हजर राहण्यासंदर्भात लेखी कळवले होते. परंतु फक्त तक्रारदार माजी सरपंच बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. सदर सुनावणीच्या अहवालात विस्तार अधिकारी सपाटे यांनी रमाई योजनेचा लाभ घेणाऱ्या सविता सुरेंद्र गाडे, व उज्वला भगवान कांबळे यांचे पती शासकीय सेवेत असल्याचे स्पष्ट पणे नमूद केले आहे.
भुईंज तलाठी कार्यालायातील या अनागोंदी कारभारामुळे एकच खळबळ उडाली असून संबधीत तलाठी व त्यांना मदत करणारा कोतवाल महेश सुतार व असशासकीय बोगस महसूल कर्मचारी विकास गुलाब खरात व त्यांचे सनियंत्रण करणाऱ्या मंडळाअधिकारी इंगळे यांच्यावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का.? असा प्रश्न सर्वसमन्यातून विचारला जाऊ लागला आहे. बोगस महसूल कर्मचारी विकास खरात हे अनेक वर्षे तलाठी कार्यालयात शासकीय दप्तर बेकायदेशीर पणे हाताळत असल्याच्या तक्रारी वारंवार तहसीलदार व अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे झाल्या आहेत. तसेच यासंबंधी ग्रामसभेत ठरावही झाले आहेत. गावकामगार तलाठी हा ग्रामपंचायत स्तरावरचा शासनाचे कणा व डोळे असणारा घटक आहे. कामकाजात पारदर्शकता ठेवणे हे त्याचे कर्तव्य असताना केवळ आर्थिक हितसंबंधातुन संगनमताने गाडे व कांबळे यांना बोगस दाखले देऊन शासनाची फसवणूक केल्याने तेही तितकेच दोषी ठरले आहेत. तलाठी व त्याच्या सहकाऱ्यांनी अजून अजून किती भानगडी केल्या आहेत ? या विषयी परिसरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
भुईंज तलाठी कार्यालयात घडलेला प्रकार धक्कादायक असून स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणारे जिल्हा प्रशासन रमाई घरकुल योजनेचा बेकायदेशीर पणे लाभ घेणाऱ्या लाभार्थी व त्यांना मदत करणाऱ्या तलाठी, कोतवाल, व "त्या" स्वयंघोषित बोगस महसूल कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार का.? त्यांचे रमाई घरकुल नामंजूर करणार का.? असा प्रश्न उपस्थित करून दक्ष नागरिक फाऊंडेशन चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सणस व वाई तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केला असून प्रशासनाने येत्या आठवड्याभरात संबंधितांवर कायदेशीर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |