सातारा : राज्यस्तरावरील महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशनच्या सचिवपदी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांची फेर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते देसाई यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत आणि संचालक उपस्थित होते.
महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथील साखर संकुलात नुकतीच पार पडली. यावेळी असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विठ्ठलराव सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांची तर, उपाध्यक्षपदी श्रीपुर येथील पांडूरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. अगस्ती कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची खजीनदारपदी निवड झाली. दरम्यान, अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांची असोसिएशनच्या सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज आदर्शवत असून देसाई हे या कारखान्याचा कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार गेली 7 वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळत आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांची प्रशासकीय कामकाजाकरिता मोलाची साथ मिळत असल्याने आणि संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावर असून सर्वांच्या सहकार्यामुळेच हे अनुकुल होत असल्याचे देसाई म्हणाले.
देसाई यांच्या फेर निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे, चेअरमन सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांच्यासह संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी, कामगार व कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |