मुंबई : लोअरपरळ येथे बावला मस्जिद समोर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिघांना चिरडल्याने या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची घटना समजताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली होती.
लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या पुलाखाली सोमवारी रात्री ११.३० वाजता हा दुर्देवी अपघात घडला. दारुच्या नशेत असलेला डंपरचालक भरधाव वेगाने या पुलाखालून जात होता. यावेळी त्याचं डंपरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गाड्यांना धडक द्यायलाय सुरुवात केली. या डंपरच्या धडकेत एका टॅक्सीला नुकसान झाले असून एका कारचा चक्काचूर झाला आहे. त्यानंतर हा डंपरचालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावरून चालणाऱ्या तिघा जणांना चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नायर रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कल्याण येथे राहणारे संजय सखाराम पवार (वय ५९) यांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व्यक्तिची ओळख अद्याप पटली नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
भरधाव डंपरखाली तीनजण चिरडून ठार झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मोनोरेल पुलाखाली एकच गर्दी केली. स्थानिकांनी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडीही झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |