कराड : येथील स्वरनिर्झरने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवामुळे कराडकरांना संगीताची अपूर्व पर्वणी लाभली असून स्वरनिर्झरच्या या संगीत महोत्सवामुळे कराडच्या वैभवात भर पडली आहे. असे उद्गार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले.
कराडच्या स्वरनिर्झर संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवात केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, डॉ.ढगे, सौ.आलापिनी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी संपन्न झालेल्या सत्रामध्ये डॉ.रविंद्र घांगुर्डे व डॉ.वंदना घांगुर्डे यांनीमराठी रंगभूमीच्या संगितिक इतिहास उलगडणारा ‘शाकुंतल हे कट्यार’ हा कार्यक्रम सादर केला. यात नाट्य संगीतात झालेली स्थित्यंतरे, नाट्यगीतात वापरलेले साकी, दिंडी, अंजनीगीते असे अनेक प्रकार श्रोत्यांना ऐकायला मिळाले. नाटककार, संगीत दिग्दर्शक व गयकनट यांच्या प्रतिभेनुसार झालेले नाट्यसंगीतातील बदल सांगताना या कलाकारांनी संगीत नाटकाचा पूर्ण इतिहास नजरेसमोर उभा केला. साथसंगतीस तबला साथ माधव मोडक, ऑर्गन साथ उदय कुलकर्णी, व्हायोलिन साथ अविनाश तघाटे, संवादक संजय गोवावी, सौ.विनीता रायकर हे होते.
दुसर्या सत्राच्या पूर्वार्धात उदयोन्मुख कलाकार मानस गोसावी स्लाईड गिटार (मोहन विणा) वादन णले. राग यमन ने त्यांनी सुरवात केली. आपला जोड झाला व तीनतालातील बंदीश सादर केली. या वाद्याचे बलस्थान असलेले मीडकाम त्यांनी अत्यंत कलात्मक व कौशल्यपूर्ण रितीने केले. त्यानंतर पं.विश्वमोहन भट्ट रचित मिटींग बाय द रिव्हर ही धून नाट्यगीत घेई छंद व नंतर लोकप्रिय भजनाचा मेडते सादर केला. यांना तबलासाथ अमोल माळी यांनी केली.
उत्तरर्धात विदुषी यशस्वी सरपोतदार यांचे सुश्राव्य शास्त्रीय, उपशास्त्रीय व अभंग गायन झाले. त्यांनी सादरीकरणाची सुरवात राग धूप मधील विलंबित त्रितालातील अब मान लेया ख्यालाने केली. त्यानंरत प्रसिध्द बंदीश सहेता रे व तराफा साद रकेला. त्यानंतर जोगा रागात मध्यलय रूपक मधील मोरा लाडला व त्रितालातील बनरा बन आयो या बंदिशी सादर केलया. मीड बेहेलाव्यातील युक्त त्यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दमदार सुरेल आवाज लयीच्या अंगाने बंदिशीची मांडणी, अलगद समेवर येण्याची खुबी त्याचबरोर दाणेदार अर्थपूर्ण ताना यामुळे त्यांचे गायकन रंगत गेले त्यानंतर खमाज रागातील प्रसिध्द ठुमरी छब दिखला जा, पिलू रागातील आनबान हा दादरा श्यामकल्याण रागावर प्रसिध्द ठुमरी छब दिखला जा, पिलू रागातील आनबान हा दादरा श्यामकल्याण रागावर आधारित स्वतः संगीतबध्द केलेले राम बरवा, कृष्ण बरवा हे भजन सादर केले मैफिलीची सांगता काही चुकले माकले या भैरवीतील तुकारामांच्या अभंगाने केली. त्यांना संवादिनी साथ लिलाधर चकदेव व तबलासाथ ॠग्वेद देशपांडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी स्वरनिर्झरच्या संचालिका सौ.आलापिनी जोशी, सौ.सविता इनामदार, सौ.रोहिणी भिंतोडे, प्रशांत कुलकर्णी, मकरंद किर्लोस्कर, अमृत गिझरे, गोपाळ जोशी, मिलींद जोशी, विध्देश्वर चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या महोत्सवासाठी कराड अर्बन बँकेच्या व्यव्सथापनाचेही मोलाचे सहकार्य झाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |