सातारा : खेड (ता.सातारा) येथील विकासनगरमध्ये राहणार्या युवकाच्या कुटुंबास व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देणार्या गोडोली येथील राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकुर शेख, गणेश मारुती निकम या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सातार्यात सावकारीची पाळेमुळे आणखी खोलवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, रोहित सुरेश शेंडे (वय 28, रा. विकासनगर) हा युवक राहत आहे. रोहित याने जून 2015 मध्ये तन्वीर शेख याच्याकडून वाळू व्यवसायाकरिता 50 हजार रुपये दरमहा 20 टक्के व्याजाने घेतले होते. याबदल्यात शेख याने शेंडे याची दुचाकी स्वत:च्या ताब्यात ठेवली. घेतलेल्या रक्कमेच्या बदल्यात शेंड याने 1 लाख रुपयांची परतफेट केली होती. रक्कम परत देवूनही शेख याने तक्रारदार याची दुचाकी परत केली नाही.
दरम्यान, तक्रारदार याने पुन्हा संशयिताकडून ऑक्टोंबर 2015 मध्ये शेंडे याने 5 लाख रुपये 10 टक्के व्याजाने शेख याच्याकडून घेतले. व्याजाने घेतलेल्या 5 लाख रुपयांच्या बदल्यात शेंडे याने 11 लाख 70 हजारांची परत फेड केली. सर्व रक्कम देवूनही शेख हा त्याचे साथीदार मोरे, निकम यांना घेवून रात्री अपरात्री शेंडे यांच्या घरात घुसून व्याज आणि मुद्दल बाकी असल्याचे सांगून धमकावत होता. सातार्यात राहून देणार नाही, पोलिसांत गेला तरी काही होणार नाही, असे म्हणून संशयित सर्व वारंवार तक्रारदार व कुटुंबियांना त्रास देत असल्याने शेंडे कुटुंबिय भितीच्या छायेखाली होते.
मार्च 2016 च्या मध्यरात्री शेख हा मोरे, निकम यांच्यासमवेत शेंडे यांच्या घरी आला. घरी आलेल्या त्या तिघांनी शेंडे यांच्या कुटुंबियांना शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेंडे यांच्या वडीलांवर पिस्तुल रोखत त्या तिघांनी मुद्दल आणि व्याज न फेडल्यास कुटुंबियांना जीवे मारु, अशी धमकी दिली. वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून शेंडे यांनी सोमवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |