02:28am | Oct 11, 2019 |
सातारा : काही लोक काडीचेही काम करत नाहीत पण, अशांना आमदार होण्याची स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत. मग असे लोक निवडणूक आली की जनतेबद्दल खोटा कळवळा दाखवत वाट्टेल त्या थापा मारत असतात. फक्त आणि फक्त सातारा- जावली मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असून या ध्येयपूर्तीसाठीच मी भाजपात गेलो आहे. सत्तेच्या माध्यमातून सातारा शहरासह संपूर्ण मतदारसंघातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. याची खात्री जनतेला आहे. त्यामुळे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या थापडयांना जनताच घरचा रस्ता दाखवेल, असे प्रतिपादन सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात गुरुवारी अदालत वाडा येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांचे शुभाशीर्वाद घेऊन पदयात्रा सुरु झाली. अदालत वाडा, पै. चौक, वाघाची नळी, देवी चौक, कमानी हौद, कूपर कारखाना, ऍड. कमलेश पिसाळ घर, ते ठोंबरे घर, शिंदे गल्ली, घोरपडे वखार, अगर पालिका ऑफिस ते चार भिंती या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांशी सवांद साधून शिवेंद्रसिंहराजे यांनी कमळाला विजयी करण्याचे आवाहन केले.
पदयात्रेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अमोल मोहिते, जनार्दन जगदाळे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, धनंजय जांभळे, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे, आशा पंडित, यशोधन नारकर, प्रकाश बडेकर, नासिर शेख, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, मुख्तार आतार आदी मान्यवर तसेच आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत आणि रांगोळी काढून त्यांचॆ उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. पदयात्रेत मुस्लिम बांधव हातात कमळ चिन्ह असलेले झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण पदयात्रेत मुस्लिम बांधव हात उंच करून शिवेंद्रसिंहराजे आंही उदयनराजे यांना विजयी करण्याचे आवाहन करत होते.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सातारा शहर आणि सातारा- जावळी मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु असून आगामी काळात भाजप च्या माध्यमातून अधिक गतीने विकासकामे मार्गी लावणार आहे. सातारकर आणि जावलीकर हीच माझी ताकत असून माझी ताकत पाहून विरोधकांना धडकी भरत आहे. कोणाच्याही भूलथापांना बाली न पडता जनता कमळाला निवडून देईल आणि विरोधकांना घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
शुक्रवार दि. ११ रोजी सकाळी ७ वाजता मोनार्क हॉटेल चौक येथून निघणार असून एमजेपी ते एस.टी. कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बझार, जगताप हॉस्पिटल, कोल्हाटी वस्ती मस्जिद ते मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, अभयसिंहराजे भोसले कमान ते हायवेने म्हस्के वाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, मोरे पतसंस्था, गोडोली जकात नाका या मार्गावर पदयात्रा निघणार आहे. पदयात्रेला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६ ते ८ यावेळेत मंगळवार तळे आणि ८ ते १० यावेळेत पंतांचा गोट, सतीश जाधव घराशेजारी कोपरा सभा होणार असून सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |