07:05pm | Sep 13, 2018 |
सातारा : राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील इतर मार्गांवर वाटमारी करणार्या अट्टल गुन्हेगारास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला महामार्गावर ट्रक चालकाला लुटणारा अट्टल गुन्हेगाराबाबत खबर्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांनी तासवडे टोलनाका परिसरात सापळा रचला होता. तसेच तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी तासवडे टोलनाक्याच्या पुढे कराडकडे जाणार्या रस्त्यावर विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरुन जाणार्या संशयिताला अडवून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने सुमारे 6 व दोन महिन्यांपूर्वी महामार्गावर दोनवेळा ट्रकचालकांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच अशाचप्रकारे जिल्ह्यातील इतर मार्गांवरसुद्धा त्याने वाटमारी केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित संशयित आरोपीची चौकशी सुरु असून त्याच्याकडून अनेक वाटमारीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, तळबीड पोलीस स्टेशनच्या वैशाली पाटील, पोलीस उप निरीक्षक सागर गवसणे, पोलीस कर्मचारी पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, प्रवीण शिंदे, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी एलसीबीच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
ट्रक चालकांना आवाहन
जिल्ह्यात यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 तसेच जिल्ह्यातील इतर मार्गांवर ट्रक व वाहनचालकांना अडवून वाटमारी करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटना तसेच संशयितांबाबत काही माहिती असल्यास तत्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात किंवा सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला 02162 - 233923 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |