सातारा : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीचा बसस्थानक परिसरात विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाई तालुक्यातील पीडित युवतीने आकाश जाधव (रा. देगावफाटा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पीडित युवती ही वाई तालुक्यातील असून ती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिकण्यास आहे. त्या युवतीस तिच्या मैत्रीणीच्या ओळखीचा असलेल्या आकाश जाधव हा सतत ‘मला तू आवडेस, तू मला हो म्हण’, असे म्हणून त्रास देत होता. मात्र, पीडितेने त्याला याबाबत पुन्हा न बोलण्याची ताकीद दिली होती. तरीही आकाश तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. दि. १८ रोजी पीडित युवती परीक्षा असल्याने महाविद्यालयात निघाली होती. त्यावेळी आकाशने तिला बसस्थानक परिसरात थांबवले व ‘मला तुझ्याशी काही बोलायचे आहे’, असे म्हणून त्याने तिचा हात ओढला. त्यामुळे चिडलेल्या युवतीने त्याच्या कानाखाली दिल्याने तो त्या ठिकाणावरून निघून गेला. मात्र, त्यानंतर त्याने तिला फोन करून ‘आपण भेटूया, मला सगळा हिशोब बरोबर करायचा आहे’, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडित युवतीने या घटनेची माहिती बहिणीला दिल्यानंतर तिने आकाशला फोन करून याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करून दमदाटी केली. अखेर भीतीपोटी हा सारा प्रकार अखेर पीडितेने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी आकाशला फोन करून मुलीला त्रास न देण्याबाबत तंबी दिली. परंतु त्याने त्यांनाही शिवीगाळ करून लवकरच सगळे हिशोब केले जातील, अशी धमकी दिल्याने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |