03:00pm | Apr 26, 2018 |
सातारा : सातारा पोलीस विभागाने सातारा पोलीस पब्लीक स्कूल या नावाने सीबीएसई पॅटर्न शाळा सुरु केली आहे. ही पोलीस विभागासाठी अभिमानाची गोष्ट असून या शाळेमुळे पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल. शाळेसाठी आणखीन कशा सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी आज दिले.
सातारा पोलीस पब्लीक स्कूल, पाळणाघराचे तसेच अलंकार हॉलचे नुतनीकरण करण्यात आले आहे, याचे उद्घाटन आज पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, प्रेरणा कट्टे, कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, शाळेच्या मुख्याध्यापक तृप्ती वाणी आदी यावेळी उपस्थित होते.
मुलांचे पालक हे पहिले गुरु असतात. दुसरे गुरु हे शिक्षक असतात भावी पिढी घडविण्याचे चांगले काम शिक्षकांच्या हाती असते. या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. या शाळेतील मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी उत्तम दर्जाची पुस्तके ठेवावीत. या शाळेतील विद्यार्थी जीवनात कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करावेत. सर्व पोलिस स्टेशन स्मार्ट पोलिस स्टेशन झाल्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन करुन पोलीस अधीक्षकांचे सातारा जिल्ह्यात चांगले काम केले असून यापुढेही ते अशा पद्धतीने काम करतील, असा विश्वासही पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी शेवटी व्यक्त केला.
सातारा पोलीस पब्लीक स्कूल व पाळणाघाराचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शाळेची व पाळणाघराची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातला पोलीस स्टेशन पाटण, दहिवडी, सातारा शहर, शाहुपूरी तळबीड, उंब्रज, कोयनानगर, फलटण शहर, फलटण ग्रामीण, खंडाळा, शिरवळ, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार, पुसेगाव, वडूज, म्हसवड, औंध या पोलीस स्टेशनला पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते स्मार्ट पोलीस स्टेशन प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
ही शाळा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्यातून सुरु करण्यात आल्याचे यावेळी पोलीस उपअधीक्षक प्ररेणा कट्टे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |