02:36am | Apr 11, 2019 |
सातारा : रस्ता का खणला, असे म्हणत खोर्याने खून करण्याच्या उद्देशाने हल्ला करुन (हाफ मर्डर) जखमी केल्याप्रकरणी हिंदुराव दशरथ जाधव (वय 30, रा.राजाळे, ता.फलटण) याला प्रमुख जिल्हा न्यायाधिश आर.डी.सावंत यांनी 7 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणी सौ.छाया किरण निंबाळकर यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे. दि. 27 सप्टेबर 2015 रोजी तक्रारदार छाया निंबाळकर त्यांचे पती किरण निंबाळकर हे शेतामध्ये काम करत होते. यावेळी हिंदुराव जाधव हा त्याच्या शेतामध्ये काम करत होता. किरण निंबाळकर हे शेतामध्ये काम करत असताना अचानक हिंदुराव जाधव याने किरण निंबाळकर यांना उद्देशून ‘तू रस्ता का खणला?’, असे म्हणत हातातील खोर्याने हल्ला चढवला. या घटनेत किरण निंबाळकर हे गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि एस.के. शिंगटे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात खटला सुरु झाल्यानंतर सरकार व बचाव पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी हिंदुराव जाधव याला 7 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडांची शिक्षा ठोठावली.
प्रासिक्युशन स्कॉडचे फौजदार प्रकाश कबुले, राजेंद्र भुतकर, पोलिस हवालदार अमित भरते, संजय पाटील, अजित शिंदे, सुनील सावंत, कांचन बेंद्रे, क्रांती निकम, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |