03:01am | Oct 14, 2019 |
सातारा : गेल्या पाच वर्षात सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक गावात, वाडी- वस्तीवर विकासगंगा पोहचली आहे. राजकारणापेक्षा मी नेहमीच समाजकारणाला महत्व दिले असून मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवले आहे. त्याच ध्येयातून मतदारसंघाचा कायापालट झाला असून जी कामे केली ती जनतेसमोर आहेत. त्यामुळे विरोधकांच्या फुका बातांमुळे काहीही फरक पडणार नाही. जनता फक्त विकासकामांच्या आणि माझ्या पाठीशी उभी आहे. भाजपच्या माध्यमातून आगमी काळात विकासाच्या बाबतीत आपला मतदारसंघ राज्यात अग्रेसर असेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचेसातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
किडगाव ता. सातारा येथे आयोजित प्रचार सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगीजिल्हा परिषद सदस्य प्रतिक कदम, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्या सौ. सरिता इंदलकर, माजी सभापती धर्मराज घोरपडे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, नामदेवराव सावंत, इंद्रजीत ढेंबरे, माजी उपसभापती तात्यासाहेब वाघमळे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप निंबाळकर, सरपंच सौ.मंदाकिनी पवार, सुरेश टिळेकर, अरुण कापसे, अमित लावंघरे, संभाजी इंदलकर, महेश गाडे, बाजीराव करंजकर, विश्वजीत लाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गट व गणात गाठीभेटी, बैठका, पदयात्रा तसेच कोपरा सभेद्वारे सातारा-जावली तालुका पिंजून काढला आहे. दरम्यान, संपूर्ण मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागली असून राजेंच्या विजयासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आपले लोकप्रिय नेते बाबाराजे आपल्या गावात येणार एवढा निरोप पोहोचताच कार्यकर्ते ग्रामस्थ व माता-भगिनी त्यांच्या येण्याची वाट पाहत असतात. राजे आले की फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा निनाद, महिलांकडून औक्षण आणि 'बाबाराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है',शिवेंद्रराजे यांचा विजय असो,एक नेता एकच आवाज बाबा महाराज बाबा महाराज,अशा अनेक घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून जातो. याचा प्रत्यय मतदारसंघात ठिकठिकाणी येत आहे. फक्त निवडून नव्हेच तर महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने बाबाराजेंना निवडून आणण्याचा निर्धार करीत गावोगावचे कार्यकर्ते कमला लागल्याचे दिसत आहे.
मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये भिरकीट सुरु असून काल शिवेंद्रसिंहराजेंनी वेळेकामथी, आगुंडेवाडी,चोरगेवाडी, कण्हेर, बेबलेवाडी, ठोंबरेवाडी, गवडी, सारखळ, किडगांव, माळ्याचीवाडी, चिंचणी, धावडशी आदी गांवे आणि वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या. बाबाराजे यांनी लोकांना दिलेले भरभरून प्रेम व गावागावात पोहोचलेली विकासकामे याची जाण ठेवून कार्यकर्ते शिवेंद्रसिंहराजे यांच्या विजयासाठी घर टू घर जात आहेत. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून गावागावात विकासकामे झाली असून आम्ही बाबाराजेंच्याच सोबत आहोत. त्यांनी केलेल्या विकासकामांची पोहोचपावती देण्याची वेळ आली असून राज्यात विक्रमी मतांनी शिवेंद्रसिंहराजेंना विजयी करू, असा निर्धार गावागावातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |