कराड : माजी आ.स्व. भास्करराव शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळे मलकापूरचा चेहरामोहरा बदलला आहे. भविष्यात मलकापूरची ओळख भास्करराव शिंदे यांच्या नावाने व्हावी, एवढे मोठे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
कै.भास्करराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेत्रचिकित्सालयाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयंत पालकर, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, अजित पाटील.चिखलीकर, धनाजी काटकर, राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले, मलकापूरच्या नावीन्यपूर्ण योजना आणि विकासामध्ये भास्करराव शिंदे यांचे योगदान मोठे आहे. एखादी गोष्ट दुसर्याला देण्याचा आनंद फार मोठा आहे, तो भास्करराव शिंदे यांना मिळाला. त्यांनी कार्यकर्तृत्वातून शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. हजार.बाराशे लोकसंख्या असलेले मलिकापूर आज मलकापूर नावाने देशाच्या नकाशावर झळकत आहे. भास्करराव शिंदे म्हटले की ‘माय फ्रेंड’ हा शब्द प्रत्येकालाच आठवतो. त्यांनी विकासाचे पाहिलेले स्पप्न आज मनोहर शिंदे यांच्या रुपाने सत्यात उतरताना दिसत आहे. मलकापूरची प्रगती यापेक्षाही अधिक गतीने होईल.
अर्बन कुटुंबप्रमुख जोशी म्हणाले, मनोहर शिंदे यांनी मलकापूरमध्ये विधायक कामांचा सपाटा लावला आहे. त्यासाठी त्यांना पालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. नेत्रचिकित्सालयाच्या माध्यमातून नवीन दालन सुरु झाले आहे. भास्करराव शिंदे यांच्या नावाने सुरु झालेले नेत्रचिकित्सालय भविष्यात नावारुपाला येईल. पालिकेच्या विधायक योजनेत अर्बन बँकेचा सहभाग असेल. यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल रवींद्र देशपांडे, डॉ. सतीश शिंदे, अजित पाटील. चिखलीकर आदींची भाषणे झाली. लायन्स क्लबच्या अध्यक्षांना प्रतापराव शिंदे यांच्या उपस्थितीत खा. पाटील यांच्या हस्ते भास्करराव शिंदे नेत्रचिकित्सालयाच्या हस्तांतराची कागदपत्रे देण्यात आली. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सर्जेराव माने, सौ. ए. डी. शेडगे व सौ. एम. जी. बारसिंग यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक आनंद पाटील यांनी आभार मानले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |