02:18am | Sep 02, 2018 |
कोरेगाव : धूम स्टाईलने भरधाव वेगाने कोरेगाव-रहिमतपूर राज्य मार्गावरुन कॉलेजमार्गावरुन निघालेल्या मोटार सायकलस्वाराने रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकणार्या वडाचीवाडी (ता. कोरेगाव) गावच्या एका महाविद्यालयीन युवतीला जोरदार धडक देवून कोरेगाव येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीसमोर गंभीररित्या जखमी करुन पळ काढला. पाठीमागून येणार्या कोरेगावच्या तहसीलदार श्रीमती स्मिता पवार यांनी प्रसंगावधान दाखवून गंभीररित्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या शिवानी युवतीला स्वत:च्या शासकीय गाडीत घालून कोरेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आणि महसूल विभागातील जागी असलेल्या माणूसकीच्या परिचय करुन दिला.
याबाबत माहिती अशी की, शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये शिकणारी महाविद्यालयीन विद्यार्थींनी शिवानी शंकर भोसले (वय 18) ही कॉलेज सुटल्यावर कोरेगाव रहिमतपूर रस्त्याने दुपारी 3 च्या सुमारास तिच्या घरी जाण्यासाठी (वडाचीवाडी, ता. कोरेगाव) तिच्या मैत्रिणीच्या बरोबर रस्त्याने चालत होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या पल्सर मोटरसायकल (एम.एच.11 ए.क्यू.6890) स्वाराने कोरेगाव येथील शांतीनगर परिसरातील पाण्याच्या मोठ्या टाकीसमोर मैत्रिणीसोबत चालणार्या शिवानी भोसले या महाविद्यालयीन युवतीस जोरदार धडक दिली आणि गंभीररित्या जखमी केले. जखमी अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवानी भोसले या युवतीस मदत न करता संबंधित मोटरसायकल स्वार अक्षय कुंभार (रा.कोरेगाव) याने घटनास्थळावरुन पोबारा केला.
त्याचवेळी कोरेगाव-रहिमतपूर रस्त्याने आपले कार्यालयीन कामकाज करित येत असणार्या कोरेगावच्या तहसीलदार श्रीमती स्मिता पवार यांनी त्यांची शासकीय गाडी थांबवून गंभीररित्या जखमी झालेल्या रस्त्यावर पडलेल्या शिवानी भोसले या युवतीस स्वत:च्या शासकीय वाहनात घालून पुढील वैद्यकीय उपचारासाठी कोरेगाव येथील एका खाजगी दवाखान्यात स्वत: दाखल केले. घटनास्थळावरुन धूम ठोकणार्या बाईक चालक अक्षय कुंभार यास कोरेगाव पोलीसांनी काही तासातच ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा नोंदवला. गंभीररित्या जखमी झालेल्या शिवानी भोसले या युवतीवर पुढील वैद्यकीय उपचार सुरु असून अशा धूम स्टाईलने मोटर सायकल चालवून इतरांच्या जीवीताला धोका निर्माण करणार्या सर्वच मोटर सायकल स्वारांचा कोरेगाव पोलीसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी कोरेगाव शहरातून होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |