सातारा : क्रेन पार्कींग केल्यानंतर त्यामधील 54 हजार रुपये किंमतीचे बॅटरी, टायर चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना विलासपूर येथे घडली असून अवघ्या पाच तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावून कारवाई केली.
विनोद शिंदे (रा.गोडोली), नंदूकुमार बकोडिया (रा.एमआयडीसी), नितीन डोळसे (मूळ रा.जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किशोर परशुराम पिसाळ (रा.विलासपूर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या के्रनमधील बॅटरी, टायरसह इतर वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील एक कामगार नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तो सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी करताच तिघांनी चोरी केल्याची कबुली देवून चोरलेले साहित्य पोलिसांना दिले. अवघ्या पाच तासात पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाजीराव ढेकळे, पोलिस हवालदार निलेश गायकवाड, धीरज कुंभार, मंगेश सोनावणे, सुधीर भोसले, मुनीर मुल्ला यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |