सातारा : येथील सदरबझारमधील नविन म्हाडा कॉलनीशेजारील बंद घरचा मागील दरवाजा तोडून भरदिवसा चोरटयांनी तीन तोळ्याचे मंगळसूत्र व सात हजार रूपये रोख असा एक लाखाचा ऐवज भर दुपारी लांबवला. ही घटना बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यामध्ये अज्ञात चोरटय़ांनी तीन तोळ्याच्या सोन्याच्या दागिण्यांसह 7 हजाराची रोकड लांबविली असून एकूण लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. भरदिवसा घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहीती अशी, सचिन दिनकर किरतकुडवे हे आपल्या कुटुंबियासोबत नविन म्हाडा कॉलनी, सदरबझार सातारा येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी सचिन हे एलआयसी ऑफिस तर त्यांच्या पत्नी पाटबंधारे विभागात कामास सकाळी १० वाजता घराबाहरे पडल्या. तर त्यांचा मुलगा कॉलेजला गेला. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी किरतकुवडे यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी घरातील कपाटे उघडून सर्व साहित्य अस्ताविस्त केले. त्यांनी कपाटातील ३ तोळ्याचे मंगळसुत्र व ७ हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सचिन यांच्या पत्नी दुपारी २ च्या सुमारास जेवण करण्यासाठी आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच श्वान पदकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, हे श्वान घरापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले.
दरम्यान, सचिन यांचे घर सदरबझार परिसरात आहे. त्यांच्या घराशेजारी असणारे काही बंगले बंद अवस्थेत आहेत. मात्र, चोरट्याने सचिन यांचेच घर टार्गेट करून तब्ब्ल एक लाखाचा ऐवज लंपास केला. भरदिवसा नागरीवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |