02:48am | Mar 26, 2020 |
सातारा : स्थापनेपासूनच वादग्रत ठरलेल्या सातारा शहराजवळील शाहुपुरी ग्रामपंचायतीने देशभर संचारबंदी असतानाही ग्रामविकास अधिकारी व सत्ताधारी आघाडीने मासिक सभेची नोटीस पाठवून कायद्यालाच आवाहन दिले आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सत्ताधारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
२६ मार्च २०२० रोजी दुपारी दोन वाजता शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा घेण्यात येणार आहे. असे लेखी पत्र दि २१ मार्च रोजी पाठविण्यात आले होते.यामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी चर्चा होईल असे उपस्थित सदस्य यांना वाटले होते. पण, त्याबाबत तसेच कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी कोणती पावले उचलायची ? जंतुनाशक फवारणी किती दिवसातून करायची? याचाही विषय पत्रिकेत समावेश नसल्याने काही सदस्य आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. जिथे अर्थकारण आहे ते विषय महत्वाचे होते का? असा मार्मिकपणे प्रश्न केला. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील मेळावे, सभा, कार्यक्रम घेऊ नये असा आदेश १९ मार्च रोजी काढला होता. त्याचे काय झाले ? असे ही विचारण्यात आले त्याचे समाधानकारक उत्तर सरपंच, पदाधिकारी व अधिकारी देऊ शकले नाही. उलट लेखी पत्र देण्यास नकार देऊन व्हॉटसपवर मेसेज देण्यात धन्यता मानली आहे.
सभेच्या नोटीसीमध्ये येणाऱ्या महिन्याच्या खर्चाबाबत विचार करणे तसेच विकासकामांच्या आलेल्या निविदावर चर्चा करणे, मक्तेदार नेमणे हे असले विषय हितसंबंध जपण्यासाठी घेतले होते. शाहूपुरी येथील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव, शोभा केंडे, राजेंद्र मोहिते, माधवी शेटे, सुहास वाळकर, निलम देशमुख या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना आरोग्यासाठी उपयुक्त योजना कार्यन्वित कराव्या म्हणून लेखी निवेदन सादर केले होते. त्या पत्राकडेही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाबाबत शाहूपुरी ग्रामपंचायत अनभिज्ञ आहे का? असेच मानावे लागत आहे. असा सूर उमटला आहे.
शाहूपुरी नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधितांवर शासनाचा आदेश डावलणे व कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी कारवाई करावी अन्यथा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. शाहूपुरी परिसरात काही बिल्डर्स व जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या नामचिन दलालांची शाहूपुरी ग्रामपंचायत ए.टी.एम केंद्र बनले आहे. मतांची बेरीज बघून पाणी पुरवठा व विकास कामे केली जातात. ठराविक ठेकेदारी जगली पाहिजे. दलालांचे कमिशन वाढले पाहिजे म्हणून काही भागात गटारे बांधकाम व पाणी पुरवठा केली गेली आहेत. याचा पुरावा म्हणजे गंगासागर कॉलोनीमध्ये वीस ते पंचवीस वर्षे नागरिक राहत आहेत पण, आज ही गटार काम केले नाही. येथील नागरिक सोशिक आहेत. सरकारी हातपंप असून त्याला खाजगी गृहनिर्माण सोसायटीने तार कुंपण घेतले तरीही ग्रामपंचायत साधी चौकशी करीत नाही. अशा अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत. त्याचीही चर्चा यानिमित्त रंगू लागली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |